Mumbai Port Trust : लवकरचं मुंबई ते रेवस व काशिद रो-रो बोट सेवा सुरू होणार, छोट्या क्रुझसाठी सरकारचे सहाय्य

| Updated on: Apr 22, 2022 | 10:33 AM

सध्या रेवस (Revas) आणि काशिद (Kashid) दरम्यान नागरिकांना सध्या बोटीतून प्रवास करता येतोय. परंतु लवरकचं प्रवाशांना वाहनांसकट बोटीतून प्रवास करता येणं शक्य होणार आहे. कारण वाहनांसाठी रो-रो बोट सेवा सुरू होणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा (Rajeev Jalota) यांनी जाहीर केली आहे.

Mumbai Port Trust : लवकरचं मुंबई ते रेवस व काशिद रो-रो बोट सेवा सुरू होणार, छोट्या क्रुझसाठी सरकारचे सहाय्य
लवकरचं मुंबई ते रेवस व काशिद रो-रो बोट सेवा सुरू होणार
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – सध्या रेवस (Revas) आणि काशिद (Kashid) दरम्यान नागरिकांना सध्या बोटीतून प्रवास करता येतोय. परंतु लवरकचं प्रवाशांना वाहनांसकट बोटीतून प्रवास करता येणं शक्य होणार आहे. कारण वाहनांसाठी रो-रो बोट सेवा सुरू होणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा (Rajeev Jalota) यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे नेरूळ येथेही सिडकोच्या सहाय्याने जेटी बांधण्याचे काम सुरू आहे. भविष्यात रो-रो बोट सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

डोमेस्टीक क्रुझना मागणी देखील वाढेल

क्रुझ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत येत्या 14 व 15 मे रोजी पहिली इक्रेडीबल इंडीया इंटरनॅशनल क्रुझ परिषद सुध्दा आयोजित करण्यात आली आहे. त्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टने एका पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी समुद्र पर्यटनाकडे लोकांचा कल वाढत असल्याचे देखील ते म्हणाले. डोमेस्टीक क्रुझना मागणी देखील वाढेल असं सुध्दा ते म्हणाले. मोट्या आकाराच्या वॉटर टॅक्सी सेवेला पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. गेटवे येथे जेटीटी पुर्णपणे क्षमता वापरली जात आहे. तसेच नवीन जेट्टी उभारण्यास गेटवेच्या रेडिओ क्लब येथे सागरमाला येथे प्रकल्पांतर्गत मंजूरी मिळाली आहे. विशेष म्हणजे फंड देखील मंजूर झाला आहे. नेरूळ मधील जेटीचं काम अंतिम टप्प्यात असून भविष्यात त्याचा फायदा रो-रो बोटीच्या सेवेसाठी होणार आहे.

छोट्या क्रुझसाठी सरकारचे सहाय्य

समुद्र पर्यटनाच्या मागणीला दिवसेंदिवस पसंती वाढत असून इंटरनॅशनल डोमेस्टिक टुरिझमला प्रोत्साहन देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. मोठ्या क्रुझऐवजी कॉर्डिलियासारख्या छोट्या क्रुझची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार सबसिडी देणार असल्याचे राजीव जलोटा यांनी सांगितले.

Aurangabad | Raj Thackeray यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचं भाकित

Kalyan Dombivali No Electricity : पहाटे 4 वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली परिसराची बत्ती गुल! नागरीक हैराण

Juma Masijid | कर्नाटकातील मशिदीच्या नूतनीकरणादरम्यान सापडली हिंदू मंदिरासारखी रचना