गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 19 ऑक्टोबर 2033 : भाजपचे नेते, आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत हे मीडिया समोर आक्षेपार्ह शब्द वापरतात. त्या शब्दांचा जाहीर निषेध करतो. वा. पी. ली. पी. संजय राऊत यांना मी हा शब्द बहाल करतो. हाच शब्द त्यांच्या पूर्णपणे बरोबर आहे, असं म्हणत प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.
संजय राऊत यांनी ड्रग्ज प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. यांनी एकेकाळी सरकारमध्ये बसून त्यांची स्तुती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं चरित्र संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. तात्काळ या प्रकरणाचा तपास केला जाईल. त्याची चौकशी केली जाईल आणि सत्य समोर आणलं जाईल, असं देवेंद्रजींनी कालचं म्हटलं आहे, असंही प्रसाद लाड म्हणाले.
ठाकरे गटाचे युवराज काय करत होते? बांद्रा बँडस्टॅन्ड, हॉटेल हयातमध्ये काय चालू होतं? हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. ड्रग्जच्या बाबतीत युवराज्यांना पण विचारावं. खिचडी घोटाळ्यात संजय राऊत आता अडकले गेले आहेत. आम्ही कधीही सुडाचं राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुडाचं राजकारण केलं. कोर्टाने चपराक दिल्यानंतर पण त्यांनी त्रास दिला, असा घणाघाती आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.
मॅडम कमिशनर या पुस्तकातील मजकुराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला आहे. एका वृतपत्रातील कात्रणं दाखवली गेली. शरद पवारांवर आरोप करत असताना बलवानचा उल्लेख झाला. आर. आर पाटील यांनी कोणाच्या बोलण्यावर चौकशी लावल्या? आज जयंत पाटील यांचा देखील नंबर लागला असता. आर आर पाटील यांचा वापर शरद पवारांनी केला आहे. जयंत पाटील यांचाच कार्यक्रम या वेळी झाला असता. या प्रकरणावर अजितदादा बोलले आहेत की याची चौकशी करा, असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.