2019 ला उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शब्द न पाळण्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेना, ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात का? अशी चर्चा वारंवार होताना दिसते. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने यावर भाष्य केलंय. एकनाथ शिंदे हे खरं बोलत आहेत. उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा कालही होती आणि आजही आहे. हिंदुत्व विकण्याचं काम करायचं. मग ऑफर द्यायची हे सध्या त्यांचं काम सहन होण्यापलीकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा शब्द पडू दिला नाही. तीन महिन्यापुर्वीही उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत येण्याचा प्रयत्न केला. पण आता आमची दारं कायमची बंद झाली आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले.
आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनी यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर अडीच महिने अदित्य ठाकरे गायब होते. आता पराभव दिसतोय. जी लोकंसोबत होती, ती मनोरुग्ण होती. त्यामुळे काहीही बोलतात. महानायकाविरोधात महानायक अशी सध्या राजकीय परिस्थिती आहे. ज्या अदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी अंगा-खांद्यावर खेळवलं. सरकार सत्ता पक्ष, व्यवस्था दाखवली. अशा व्यक्तीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलताना त्यांची जीभ थरथरली कशी नाही? कापली कशी नाही?, असा सवाल प्रसाद लाड यांनी विचारला आहे.
तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संजय पांडेंना नियुक्त केलं होतं. त्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस, मी स्वत: , आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रविण दरेकर यांना अटक करण्याचा डाव होता. माझ्याविरोधात खोट्या केसेस टाकून इओडब्लुकडून त्रास देण्याचा कट होता. आम्हाला याचा त्रास झाला पण आम्ही लढत राहिलो, असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणालेत.
संजय राऊत मनोरुग्ण आहेत. देशात नाही तर जगात नरेंद्र मोदींचा डंका वाजलाय. अमित शाह कणखर गृहमंत्री आहेत. हनुमान जयंतीनिमित्त वडाळ्यात भाजप कार्यकर्त्यांवर काही समाज कंटकांनी हल्ला केला. 32 वार केले. भगवे झेंडे लावण्यापासून फोडण्यात आलंय. आधी वडाळा ट्रक टर्मिनलवर मी मोर्चा नेणार आहेत. तात्काळ जर कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करणार आहेत, असंही प्रसाद लाड म्हणाले.