मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण, राज्यातील मोठ्या शहरांची आकडेवारी पाहिली तर दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. मुंबई आणि पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला तर सोमवारपेक्षा आज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.(Large increase in the number of corona patients in Mumbai and Pune in the last 24 hours)
मुंबई गेल्या 24 तासांत 1 हजार 922 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 236 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. मृत झालेल्या रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 2 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या एकूण 15 हजार 263 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारची आकडेवारी पाहिली तर मुंबईत 1 हजार 712 नवे रुग्ण आढळून आले होते.
मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 92 टक्के आहे. 9 मार्च ते 15 मार्चपर्यंत मुंबईत एकूण कोविड वाढीचा दर 0.45 टक्के राहिला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 156 दिवस असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.
#CoronavirusUpdates
१६ मार्च, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/MLbHYBZQJi— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 16, 2021
पुण्यात दिवसभरात 1 हजार 925 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात पुण्यात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 2 रुग्ण हे पुण्याबाहेरील असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात सध्या 394 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील कोरोनारुग्णांची एकूण संख्या 2 लाख 21 हजार 210 झाली आहे. त्यातील 2 लाख 3 हजार 16 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत एकूण 4 हजार 969 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिवसभरात नवे १ हजार ९२५ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने १ हजार ९२५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख २१ हजार २१० इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 16, 2021
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेली वर्षभर सौरभ राव यांनी कोरोनाशी लढण्यासाठी रणनिती आखली. पण अखेर आज त्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, सौरभ राव हे शुक्रवारी विधानभवनात अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले होते. सौरभ राव यांची कोरोना चाचणी केल्यानंतर आज दुपारी त्यांचा अहवाल आला. त्यात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं. त्यामुळे सौरभ राव यांच्यासोबत असलेले अनेक अधिकारी आता विलगीकरणात गेले आहेत.
संबंधित बातम्या :
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोनाचा पॉझिटिव्ह, शुक्रवारी अजितदादांच्या बैठकीला उपस्थित!
Large increase in the number of corona patients in Mumbai and Pune in the last 24 hours