मुंबई: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांसाठी मार्गदर्शक बोर्ड लावण्यासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत एक्स्प्रेस वेवरील पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येईल. त्यामुळे या मार्गावरुन दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागू शकतो.
दरम्यान, दुपारी 12 ते 2 या वेळेत एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद ठेवली असली, तरी ही वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जर दुपारच्या वेळेत जाणार असाल, तर तुम्हाला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन जावं लागेल.
वाहनचालकांसाठी जाहिरात बोर्ड
दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण आज जो बोर्ड लावणार आहे, त्याचा वाहनचालकांसाठी मोठा फायदा होणार आहे. वाहनचालकांसाठी मार्गदर्शक साईनबोर्ड, व्हिडीओ मेसेज यासह अन्य मार्गदर्शक फलक यामार्गावर पाहायला मिळतील. या कामादरम्यान अवजड वाहनांची वाहतूक रोखली जाणार आहे.
सुमारे दोन तासानंतर काम पूर्ण होताच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक पुन्हा नियमित होईल अशी अपेक्षा आहे.