मुंबई : तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात बसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. अशावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. तिथून त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत. वादळाची तीव्रता संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलंय. (Aditya Thackeray visits BMC control room on the backdrop of the cyclone)
वादळची दिशा गुजरातकडे आहे, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, सखल भागात पाणी साचलंय, जम्बो सेंटर्सच्या मेंटेन्सनची कामं सुरु आहेत, रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, विनाकारण घराबाहेर पडू नका, हे वादळ आहे, मुंबईत कधीही न झालेलं वारं आपण पाहात आहोत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसंच 160 मिमी, 120 मिमी पाऊस वादळ आणि वाऱ्यासह होतोय. मनुष्यहानी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हायटाईड आहे, ती निघून जाईल. पण त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल. कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई आता पाहत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Visited the Disaster Management room of the @mybmc to take an update on the current situation of the cyclone Tauktae. We are doing everything we can to keep you safe.
For your safety, stay home. For any emergencies, call 1916
(1/5) pic.twitter.com/k4U8eRe7qQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 17, 2021
त्याचबरोबर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिलीय. केंद्र आणि राज्यात चर्चा होते, आवश्यक सूचना दिल्या जातात, एकमेकांशी समन्वय साधून, सर्वजण मिळून काम करत आहोत, असंही ते म्हणाले.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थित समर्पित कोविड आरोग्य केंद्र (जम्बो कोविड सेंटर) संरचनेला ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या प्रभावाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. या कोविड केंद्राची मुख्य संरचना स्थिर आहे. प्रतीक्षालयातील छताला वादळामुळे हानी पोहोचू नये म्हणून प्रशासनाने स्वतःच प्रतीक्षालय काढून ठेवले आहे. वादळ आणि पाऊस ओसरताच बीकेसी कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेसह प्रतीक्षालय पूर्ववत उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
‘तौत्के’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत ताशी सुमारे 80 किलोमीटर या वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज लक्षात घेऊन, खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने या कोविड केंद्रातील 243 कोविड बाधित रुग्णांना शनिवारी रात्रीच इतर रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतरित केले आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती सर्व कार्यवाही करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
Aditya Thackeray visits BMC control room on the backdrop of the cyclone