Mumbai Rains LIVE : नायर रुग्णालयात पावसाचे पाणी, अत्यावश्यक सेवा वगळता कार्यालयांना सुट्टी

| Updated on: Sep 23, 2020 | 9:52 AM

मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Mumbai Rain Live Update)

Mumbai Rains LIVE : नायर रुग्णालयात पावसाचे पाणी, अत्यावश्यक सेवा वगळता कार्यालयांना सुट्टी
Follow us on

मुंबई : मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह ठिकठिकाणी गुडघ्याएवढं पाणी साचलं आहे. तसेच सांताक्रुझ, अंधेरी यासह पश्चिम उपनगरात घरांमध्ये पाणी शिरले आहे. (Mumbai Rain Live Update)

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कर्मचारी हे अडकून पडले आहेत.

LIVE UPDATE 

[svt-event title=”नायर रुग्णालयात पावसाचे पाणी शिरले” date=”23/09/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईतील पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी” date=”23/09/2020,8:45AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंकडून वरळीत घरात पाणी साचल्याचा व्हिडीओ ट्वीट, पालिकेवर टीका ” date=”23/09/2020,8:32AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पाण्याचा निचरा करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरु – पालिका आयुक्त ” date=”23/09/2020,8:26AM” class=”svt-cd-green” ]


[svt-event title=”दादर, प्रभादेवी, माहिम परिसरात पाणी साचले ” date=”23/09/2020,8:11AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापना बंद, मुंबई महापालिकेची माहिती” date=”23/09/2020,8:10AM” class=”svt-cd-green” ]


[svt-event title=”मुंबईच्या चारही मार्गांवरील लोकल वाहतूक बंद” date=”23/09/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”23/09/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पाणी साचल्यामुळे बेस्टची वाहतूक वळवली” date=”23/09/2020,8:05AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”23/09/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ]

मुंबईत अतिवृष्टीची शक्यता 

मुंबईत येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर पालघर जिल्ह्यातही ऑरेंज अॅलर्ट दिला असल्याने त्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. (Mumbai Rain Live Update)

संबंधित बातम्या : 

मुंबईत झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा कोरोनाचा बिल्डिंगमध्येच जास्त फैलाव, बीएमसीसमोर मोठं आव्हान

मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा वाढतोय, रुग्णवाढीची कारणं काय?