Mumbai Rain Update | मान्सून 2 दिवसात मुंबईत दाखल होणार, पाहा कुणी लावलाय हा अंदाज

| Updated on: Jun 24, 2023 | 6:50 PM

Mumbai Monsoon 2023 Date | मुंबईकरांचं लक्ष आता पावसाकडे लागून राहिलंय. या पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.

Mumbai Rain Update | मान्सून 2 दिवसात मुंबईत दाखल होणार, पाहा कुणी लावलाय हा अंदाज
Follow us on

 मुंबई | पावसाने यंदा मुंबईकरांना चांगलंच तंगवलंय. पार जून महिना संपत आलाय. मात्र त्यानंतरही पाऊस हवा तसा झालेला नाही. यंदा फक्त चातकच नाही, तर प्रत्येक मुंबईकर पावसाची वाट पाहतोय. उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही झालेल्या मुंबईकराला कधी पावसाचे थेंब अंगावर पडतायेत, असं झालंय. पावसाने हुलकावणी दिल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकटही आहेच. पाऊस महाराष्ट्रभर पसरलाय खरा. पण मुंबईत अपेक्षेप्रमाणे हवा तसा बरसलेला नाही. मुंबईत शनिवारी 24 जून रोजी विविध भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र आता पाऊस व्हायला हवा, नव्हे तर तो जोरदार बरसायला हवा.कारण अजून राज्यातील विविध जिल्ह्यात पेरणी लांबलेली आहे. या दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मान्सून मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलाय. हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत ही दिलासादायक बातमी दिली आहे. “मुंबईत पुढच्या 2 दिवसात मान्सूल दाखल होण्यासाठी स्थिती अनुकूल आहे. मान्सून आज अलिबागपर्यंत आला आहे.”, असं ट्विट करत होसाळीकर यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय.

हे सुद्धा वाचा

मान्सून अलिबागमध्ये दाखल

राज्यात कधी कुठे आणि कसा पाऊस?

दरम्यान राज्यात पुढील 5 दिवस म्हणजेच 25 ते 29 जून दरम्यान बहुतांश भागात पाऊस सक्रीय असण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हीच परिस्थिती नाशकातही असणार आहे. तर मराठवाड्यात पावसाचा जोर राहील.