मुंबई | मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जून महिन्यातील शेवटच्या काही दिवसांमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली. पावसाने लेट पण थेट एन्ट्री घेतली. जून महिन्याच्या या अखेरच्या आठवड्यापासून जोरदार पाऊस बरसतोय. अशातच आता पावसाने आज 28 जून बुधवारी सकाळपासून मुंबईतील विविध ठिकाणी हजेरी लावली आहे. पावसाने मुंबई आणि ठाणे शहराला चांगलंच झोडपून काढलंय. या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे मुंबईतील महत्वाचा मार्ग आता बंद करण्यात आला आहे.
पावसामुळे अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. शनिवारी 24 जून रोजी झालेल्या पावसामुळे या अंधेरी सबवेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या. त्यामुळे आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेत पालिका प्रशासनाने हा अंधेरी सबवे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दर पावसाळ्यात थोडाशा पाण्यामुळे हा अंधेरी सबवे भरतो. परिणामी वाहतूक बंद करावी लागते. यंदा महापालिका प्रशासनाने अंधेरी सबवेतील पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठी तयारी केल्याचा दावा केला होता. मात्र पालिकेचा हा दावा पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचं दिसतंय.
अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या गोखले पूलाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व-पश्चिम अशी येजा करण्यासाठी अंधेरी सबवे या मार्गे प्रवास केला जातो. पण पावसामुळे हा सबवे बंद करण्यात आलाय. त्यामुळे आता जोवर पाण्याचा निचरा होत नाही, तोवर अंधेरी सबवे मार्ग खुला केला जाणार नाही. त्यामुळे आता मुंबईकरांना जेव्हीएलआर (ट्रॉमा सेंटर), कॅप्टन गोर उड्डानपूल (विलेपार्ले) आणि मिलन सबवे या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागेल.
मुंबईतील जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदी परिसरात भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळी उपाययोजनांचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी.… pic.twitter.com/6Z2heygrGC
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 28, 2023
मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट झालंय.पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मिठी नदी परिसराची पाहणी केली. चहल यांनी बीकीसेतील मिठी नदी परिसराची पाहणी केली. चहल यांनी यावेळेस पावसाळी उपययोजनांबाबत माहिती घेतली.
दरम्यान मुंबईत 27 जून सकाळी 8 ते 28 जून सकाळी 8 या 24 तासांच्या कालावधीत मुंबईत कधी आणि किती मिमी पाऊस झाला आहे, याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने ट्विटद्वारे दिली आहे.
?️काल (२७.०६.२०२३) सकाळी ८ ते आज (२८.०६.२०२३) सकाळी ८ या कालावधीत मुंबई महानगरातील सरासरी पाऊस:
➡️मुंबई शहर- ०७ मिमी.
➡️पूर्व उपनगरे- २८ मिमी.
➡️पश्चिम उपनगरे- २९ मिमी.?️The average rainfall in Mumbai Metropolitan yesterday (27.06.2023), from 8 am to today (28.06.203) 8 am is:…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 28, 2023
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या 24 तासांच्या कालावधीत मुंबई शहरात एकूण 7 मिमी पाऊस झालाय. तर पूर्व उपनगरात 28 आणि पश्चिम उपनगरात सर्वाधिक 29 मिमी इतका पाऊस झालाय.