मुंबई : मुंबईत रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे या भागात पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबईतील लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर रस्त्या-रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. तर बेस्ट बसची वाहतूकही वळवण्यात आली आहे. (Mumbai Rain Traffic Local train Update )
मध्य रेल्वेच्या सायन, चुनाभट्टी, कुर्ला या स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे सीएसएमटी ते ठाणे, तर सीएसएमटी ते वाशी ही रेल्वे सेवा रद्द केली आहे. तसेच ठाणे ते कर्जत, कसारा, वाशी, पनवेल या ठिकाणी विशेष लोकल धावत आहेत. त्यामुळे मुंबईतील चारही लाईन बंद असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Due to heavy rain and waterlogging in Sion/Chunabhatti-Kurla, traffic has been suspended on CSMT-Thane and CSMT-Vashi sections for safety reason @Central_Railway.
Time 5.00am onwards.
Spl Shuttle services are being run b/w Thane-Kasara/Karjat and Vashi-Panvel.@RailMinIndia
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) September 22, 2020
Mumbaikars, train services on Central & Harbour lines have been suspended due to water logging following the heavy rainfall yesterday. However, Western Railway is functioning as usual.#MumbaiRains#MyBMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 23, 2020
पश्चिम रेल्वेची वाहतूक रद्द
मुसळधार पावसामुळे चर्चगेट ते अंधेरी स्थानकादरम्यान रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहेत. तर अंधेरी ते विरार या ठिकाणची लोकल वाहतूक सुरळीत सुरु आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
Due to heavy rain & water logging between Churchgate -Andheri, suburban train service is suspended & suburban local service is running normal between Andheri and Virar: Western Railway PRO #Maharashtra
— ANI (@ANI) September 23, 2020
बेस्ट बसची वाहतूक वळवली
मुंबईतील भेंडीबाजार, गोल देऊळ, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, बावला कंपाऊंड, जे जे जंक्शन, हिंदमाता, काळाचौकी, सारथी बार, वरळी सी फेस या भागात पाणी साचले आहे. त्यामुळे बेस्ट बसची वाहतूक वळवण्यात आली आहे. सखल भागातील अनेक बेस्ट बस या उड्डाणपुलामार्गे वळवण्यात आल्या आहेत.
-उड्डाणपुलामार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी
-भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट
-सायन मेन रोडमार्गे सायन रोड २४
-मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम)
– लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार
– भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव
-जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे
.@myBESTBus ची वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात आली आहे: (२/२)
– लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार
– भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव
-जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे#MumbaiRains #MyBMCUpdates— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 23, 2020
मुंबईत तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तसेच नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. (Mumbai Rain Traffic Local train Update )
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टी च्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.#MumbaiRains
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 23, 2020
संबंधित बातम्या :
Mumbai Rains | तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर, आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा