मुंबई : मुंबई शहर-उपनगरात मध्यरात्री पावसाचा कहर पाहायला मिळाला. विक्रोळीतील पंचशील नगर भागात पावसामुळे पाच-सहा घरांवर दरड कोसळली. यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. आणखी सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका आणि NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.
मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी या भागात पावसामुळे शनिवारी रात्री दोन मोठ्या दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं. चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने 14 जणांना प्राण गमवावे लागले, तर विक्रोळीत घरांवर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला. दोन्ही ठिकाणी बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे. त्यामुळे दोन्ही घटनांमधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
विक्रोळी पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात ही घटना घडली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, तिघा जणांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर दोन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ :
मुंबईत पावसाचा जोर
मुंबईतील विविध भागात शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं. बहुतांश सखल भागात पाणी साचलं होतं. पहाटेच्या सुमारास पावसाने उसंत घेतली असली तर रस्ते जलमय झाले होते.
Maharashtra: A ground-plus-one residential building collapsed in Mumbai’s Vikhroli area in the wee hours of Sunday, killing three people, as per BMC
Rescue operation is underway pic.twitter.com/Kw0WjI7iw4
— ANI (@ANI) July 18, 2021
चेंबुरमध्ये भिंत कोसळून हाहाःकार
दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 11 जणांचा मृत्यू
Mumbai Rain Live : वाशीनाका-चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररुप
(Mumbai Rains caused building collapsed in Vikhroli area due to landslide)