मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार घणाघात केलाय. काल एक फोटो ट्विट करत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. आज संजय राऊत यांनी सगळ्या प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं आहे. मकाऊत जायला हरकत नाही… पण खोटं बोलतात तो गुन्हा आहे. ते तिथे पाहण्यासाठी गेलो होते असं म्हणायला काय हरकत आहे? जे आहे ते मान्य करायला काय हरकत आहे. भाजपने हे का अंगावर घेतलं… माझ्याकडे व्हिडिओ आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.
महाराष्ट्रातील सध्या काय सुरु आहे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्र पेटलेला असताना महाराष्ट्रातील जबाबदार व्यक्ती चीनच्या मकाऊ जुगार खेळत होता. तिथे कुणी पिझ्झा खायला जात नाही. या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठेच म्हटलं नाही कीतिथे बसनं गुन्हा नाही. पण हे खोटं बोलतं आहेत. मीही मकाऊला गेलोय. पण भाजपने हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती. काल रात्री मला कळालं की, त्यांनी पोकर तिथे घेतलं. ते काय हे मी समजून घेतलं? साडे तीन कोटीचे पोकर घेतलं. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. जे छायाचित्र प्रसिद्ध झालं त्यात कुटुंब कुठेही दिसत नाही. उगाच दीड दमडीची टोळधाड आमच्यावर सोडता…, असा पलटवार राऊतांनी केलाय.
लंडनला आमदाराचं शिष्ठमंडळ गेलं, आमदारांना वाटलं अशाप्रकारे अभ्यास करावासा वाटला तर त्यांनी तो करावा. पण त्यात लपवण्यासारखं काय? मान्य करा तिथे गेलो होतो म्हणून… आणि आदित्य ठाकरेंवर जे तुम्ही आरोप करत आहात. त्याबद्दल मला इतकंच सांगायचंय की, आदित्य ठाकरे जे ड्रिंक पित आहेत. ते डायट कोक आहे. आदित्य यांच्या हातात तोच ब्रॅड आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदी पितात… त्यामुळे त्यात चूक असं काहीच नाही…, असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय.
होय आहे मी मनोरुग्ण… महाराष्ट्रच्या हिताचा आम्ही विचार करतोय. मुंबईसह महाराष्ट्र ज्या अदानीच्या घशात घालू इच्छितो त्याला आम्ही विरोध करतो. धारावी तसेच मराठी माणसाला बेघर करण्याच्या आम्ही विरोधात आम्ही आहोत. यासाठी तुम्ही मला मनोरुग्ण म्हणत असाल तर होय, मी मनोरुग्ण आहे…, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलंय.