अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन हा भाजपचा कार्यक्रम; संजय राऊत यांचा थेट निशाणा

| Updated on: Dec 28, 2023 | 10:50 AM

Sanjay Raut on BJP and Ram Mandir Inauguration Date 2024 : अयोध्येचा सातबाराही एखाद्या उद्योगपतीला देतील, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावरून भाजपवर टीका केली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन हा भाजपचा कार्यक्रम असल्याचं राऊत म्हणालेत.

अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन हा भाजपचा कार्यक्रम; संजय राऊत यांचा थेट निशाणा
Follow us on

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रणं देण्यात आलेलं नाही. यावरून ठाकरे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अयोध्येतील मंदिराचं उद्घाटन हा भाजपचा कार्यक्रम आहे, असं म्हणत संज राऊत यांनी टीका केली आहे. तर आम्ही काय त्यांच्या आमंत्रणाची वाट पाहतोय काय? आम्ही नंतर अयोध्येला जाणारच आहोत, असं संजय राऊतांनी म्हटलं.

भाजपवर निशाणा

राम मंदिर हा एका पार्टीचा प्रोग्राम आहे. हा पार्टीचा विषय आहे. यांनी प्रभू रामाला पूर्णपणे किडनॅप केलं आहे. बीजेपी कोण आहे? प्रभू रामाचे निमंत्रण देणारे हे कोण? यांचा पॉलिटिकल इव्हेंट संपल्यानंतर आम्ही स्वतः आयोजित जाणार आहोत. भाजपचा हा चुनावी का जुमला आहे. पार्टीच्या प्रोग्राम मध्ये कोणाला बोलवायचे कोणाला नाही ती त्यांची मर्जी आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

राऊतांचा भाजपला टोला

आमंत्रणाचं राजकारण या देशात कधीही झालं नव्हतं. भारताच्या नव्या संसदेचं उद्घाटन झालं. तेव्हा देखील हाच प्रकार झाला होता. हे सर्व सोहळे एका पक्षाचे आहेत. देशाचे नाही राष्ट्रीय स्वरूप नाही .अशा प्रकारे कार्यक्रम होतात त्याला राष्ट्रीय स्वरूप आणलं पाहिजे हे राष्ट्राला समर्पित असावं. संसद असेल या अयोध्या असेल. देशाच्या स्वतंत्र संग्रामामध्ये कवडीमोल योगदान चार आण्याचा देखील योगदान नाही. हिंदुस्थानच्या संसदेचे उद्घाटन करणार अयोध्येमध्ये ज्याचं योगदान नाही ते सर्वात पुढे आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे.

आम्ही, आमच्या शिवसैनिकांनी रक्त ,घाम आणि अश्रू दिले आहेत. बलिदान दिलं आहे. हे लक्षात घ्या… आता जे काय देत आहे भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा आहे ज्याची सत्ता आहे ते अशा प्रकारे काम करत आले आहे भारतीय जनता पार्टीला वाटते की पवित्र काम करत आहे, असं नाही. हे देशाची संस्कृती नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी थेट निशाणा साधला आहे.