गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 06 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कालच्या सभेत छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर अप्रत्यक्षपणे दावा सांगितला आहे. याबाबत विचारलं असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य केलंय. छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत. खरी शिवसेना ही जागा लढणार आहे. आम्ही जिंकणारे अमित शहा यांनी जी गॅंग निर्माण केली आहे. त्यांच्याकडून ती जागा काढून घेतली आहे. त्याच्याशी आमचा संबंध नाही त्यांना लाज वाटली पाहिजे. छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही लढणार आणि जिंकणार देखील, असं संजय राऊत म्हणाले.
कोल्हापूरचा मतदार हा शिवसेनेचाच मतदार होता. मतदार हा कोणाचाच नसतो… सांगलीमध्ये 2014 साली काँग्रेसचा साडेतीन लाख मतांनी पराभव झालेला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसचा मतदार नव्हता. 2019 ला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता. तो मतदार संघ आता काँग्रेसचा राहिलेला नाही. गेली तीस वर्षे सातत्याने कोल्हापूर मतदारसंघ लढत आहे. सध्या सीटिंग जागा आमची आहे. रमेश देव कोल्हापूरला आमच्या तिकिटावर लढलेले आहेत, असं म्हणत कोल्हापूरच्या लोकसभा जागेवरही संजय राऊतांनी दावा सांगितला आहे.
दीपक केसरकरांनी केलेल्या आरोपांनाही राऊतांनी उत्तर दिलं. पीएमओ ऑफिसला खुलासा करायला सांगा… आम्ही का भेटावं? आम्ही कोणाला भेटणार नाही. दीपक केसरकर ही ताकद आहे का? त्याच्या दंडावर बेडक्या नाहीत. हा मोती तलावावरचा डोमकावळा आहे. हिंमत असेल तरसावंतवाडी निवडून या, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.
तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अमित शाह महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मनोरंजन करतात. कधी मोदी येतात, कधी अमित शाह येतात. 370 कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो तरी आम्ही पाठिंबा दिला होता. अमित शाहांनी आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे. 370 कलम हटवून कश्मीरमध्ये काय दिवे लावले? कश्मीरचं नाव घ्यायची तुमची लायकी नाही. सर्जिकल स्ट्राइक बाबत आपण लोकांशी खोटं बोललात. आजही शंका निर्माण होत आहे. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. काश्मीरचा तरुण आजही बेरोजगार आहे, लाज तुम्हाला वाटली पाहिजे.2014 ला आपली घोषणा होती पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू काय झालं? त्याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे, असा घणाघात राऊतांनी केला.