राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. 26 नोव्हेंबरला सध्याची विधानसभा बरखास्त झाल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज दिवाळीचा सण आहे महाराष्ट्रात या वेळेला दिवाळी अधिक आनंदाने साजरी होईल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नरकासुरांचा आवाज झाला पण तरी नरकासुर कुठे वळवत असतील. तर या राज्याच्या मतदार राजा त्या वळवळणाऱ्या नरकासुराला त्याची जागा दाखवतील. जनतेला यापुढे महाराष्ट्रातला स्वाभिमानाने सुखाचे दिवस यावे यासाठी आमचे प्रयत्न राहतील महाविकास आघाडीचे आणि वातावरण अत्यंत पोषक आहे. कोणी काहीही म्हणू द्या. पुढल्या दिवाळीला या राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार असेल आणि जनतेच्या मनात आनंद अधिक झालेला दिसेल, असं संजय राऊत म्हणालेत.
आमच्या महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत. सहा तारखेला राहुल गांधी येत आहेत संध्याकाळी बीकेसी मैदानावर संयुक्त सभा आहे. राहुल गांधी, माननीय उद्धव ठाकरे आणि शरद पवार या सभेला असतील, असं संजय राऊत म्हणालेत.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढलेल्या जवळीकीवर संजय राऊतांनी भाष्य केलंय. राज ठाकरे आणि फडणवीस यांचे सूर जुळत असतील. एकेकाळी हेच नेते होते. राज ठाकरे हे अमित शाह आणि मोदींना पाय ठेवू देऊ नका ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. असं सांगणारे हेच नेते होते आता असं काय झालं गेलं एक महिन्यात महाराष्ट्राचे शत्रू आहेत ते महाराष्ट्राचे तारणहार आहेत असे वाटू लागले, असं टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
राजकारणात व्यक्तिगत स्वार्थ असतो त्या व्यक्तिगत स्वार्थाची तुलना कोणत्याही व्यक्तीची करता येत नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी महाराष्ट्राचे हे सर्वातवर पाहिले. मग राजकारण जे लोक महाराष्ट्रावर चाल करून आहेत. त्यांच्याशी हात मिळवणी करणे म्हणजे या महाराष्ट्रासाठी जे 106 हुतात्मे शहीद झाले. त्यांच्या भावना त्यांच्या हुतात्मे नाकारण्यासारखं आहे. या महाराष्ट्राची जनता एवढ्याने पाहत असेल तर प्रत्यक्ष मतपेटीतून झो नरसिंह बाहेर पडेल. तो नरसिंह या महाराष्ट्राच्या हिताचं काम करेल, असं संजय राऊत म्हणालेत.