देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफाटात वाजवली पाहिजे होती. पण तो फिदी फिदी हसत आहे आणि देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवत आहेत. लाज वाटली पाहिजे आम्हाला लाज वाटत आहे… तुम्ही कधी काळी या राज्याचे मुख्यमंत्री होतात आणि आमच्या पाठिंबावर मुख्यमंत्री होतात. अशा लोकांना तुम्ही पाठिशी घालताय, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. आपल्या राज्याला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत, विलासराव देशमुखांपर्यंत, वसंतराव नाईक अशा सर्व महान राजकारणाची परंपरा आहे. त्या तुळशीच्या वृंदावनात ही भांगेची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावली. आणि महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे. कधी तो त्यांचा गोपीचंद पडळकर कधी हे सदा खोत कोण आहेत? राज्यात मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी तुमचं योगदान काय आहे?, असा सवाल राऊतांनी केला आहे.
लोकशाहीत पण कोणत्या नशेत असतात काय देवेंद्र फडणवीस फिदी फीदी हसतात. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच… देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला महाराष्ट्र जवळ नाकारत आहे. वारंवार यांचा जो तिरस्कार करत आहे. हा माणूस महाराष्ट्राचा नाही. हा महाराष्ट्राचा शत्रू आहे तो यासाठी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राजा सुसंस्कृत संयमी आहे. हे संतांचा राज्य आहे. हे चांगलं राजकारणाचा राज्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आठवणीने राज्य खतम केलं आहे. म्हणून आम्हाला या राज्याची सत्ता बदलायची आहे. तुम्ही ऐका ते भाषण तुम्हाला किळस येईल, असं संजय राऊत म्हणालेत.
सदाभाऊ खोत यांनी काल जतमध्ये बोलताना शरद पवारांबाबत एकेरी भाषा वापरली. खोत यांनी शरद पवारांच्या आजारपणावरून टीका केली. अरे पवारसाहेब तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी कारखाने हाणले. बँका हाणल्या. सूत गिरण्या हाणल्या. पण पवाराला मानावं लागेल. एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतंया, मला महाराष्ट्र बदलायचाय. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला तुला चेहरा बदलायचाय? कसला चेहरा? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?, असं विधान सदाभाऊ खोत यांनी काल केलं. त्यांच्या या विधानानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत.
ठाकरे गट वचननामा जाहीर झालाय. यावरही राऊतांनी भाष्य केलंय. वचननामा आज जाहीर झाला आहे. आहे स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी तो जाहीर केलाय. उद्धवजी दौऱ्याला निघणार आहेत. त्याच्या आधी उद्धव साहेब शिवसेना जागाही महत्त्वाच्या गोष्टी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी करण्याची इच्छा आहे. आम्ही नक्कीच काल संयुक्त पंचसुत्री जाहीर केली आहे. त्याच्यामध्ये आरोग्य विषय महिला संदर्भात असे अनेक पाच महत्त्वाच्या गोष्टी आम्ही जाहीर केल्या. त्यातील आज शिवसेनेच्या संकल्पनेतला महाराष्ट्राच्या हिता संदर्भातल्या काही योजना त्या संदर्भात उद्धवजींनी सांगितल्या आहेत, असं राऊत म्हणालेत.