दक्षिण मुंबईच्या जागेसाठी देवरांनी काँग्रेसला सोडलं; पण ठाकरे गट ‘त्या’ भूमिकेवर ठाम; राऊत म्हणाले, मला…

| Updated on: Jan 14, 2024 | 11:09 AM

Sanjay Raut on Milind Deora Resigned To Congress : मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर महाविकास आघाडीतून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच दक्षिण मुंबईच्या जागेवर राऊतांनी पुन्हा एकदा दावा सांगितला आहे. वाचा...

दक्षिण मुंबईच्या जागेसाठी देवरांनी काँग्रेसला सोडलं; पण ठाकरे गट त्या भूमिकेवर ठाम; राऊत म्हणाले, मला...
Follow us on

मुंबई | 14 जानेवारी 2024 : मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्याची इच्छा असल्याने देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या या राजीनाम्यावर महाविकास आघाडीतील मित्र पत्र असलेल्या ठाकरे गटातून प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देवरा यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद देवरा जात आहेत. त्याबद्दल मला काहीच वाटत नाही. हा महाराष्ट्र आहे. जर कोणी निवडणूक लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी जात असतो, असं संजय राऊत म्हणालेत.

राऊत काय म्हणाले?

अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत. दोन वेळा त्यातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे अरविंद सावंत जर तिकडे निवडणूक लढणार असेल तर त्यामध्ये चुकीचं काय? ती जागा परंपरेने शिवसेनेची आहे. आम्ही तिथून लढू. शिवसेनेमधून अनेक लोक बाहेर गेले आहेत. लोक त्या ठिकाणी पक्ष सोडून जात असतात. जे गेले त्यांना जाऊ द्या. त्याबद्दल मला काहीच वाटत नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

मिलिंद देवरा यांचा राजीनामा

मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबईच्या लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी मिलिंद देवरा इच्छुक आहेत. मात्र सध्या महाविकास आघाडीतील परस्थिती पाहता या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. ‘जो जिंकेल त्याची जागा’ असा महाविकास आघाडीचा प्राथमिक फॉर्म्युला आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतून दोनदा निवडून आले आहेत. अशात ठाकरे गटाने या जागेवर दावा केला आहे. याचमुळे मिलिंद देवरा मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. त्यानंतर आज त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राऊतांची राणेंवर टीका

एक केंद्रीय मंत्री, नारायण तातू राणे, यांनी शंकराचार्य यांच्या बद्दल एक भूमिका व्यक्त केली, जसे ख्रिश्चन धर्मात पोप असतात, मुस्लिम धर्मात त्यांचे धर्मगुरू असतात तसे शंकराचार्य आमच्या साठी आहेत, धर्माचे मार्ग दाखवतात, पण हे कोणी जे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल त्यांनी 22 तारखेच्या आधी माफी मागावी, असंही राऊत यावेळी म्हणाले.