गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 18 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना काल ईडीकडून अटक झाली. आज सकाळी ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर एसीबीच्या पथकाकडून धाड टाकण्यात आली. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना शिंदेगट आणि भाजपवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. दोन दिवसाआधी आम्ही महा पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आमच्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे. पण हे लोक सच्चे शिवसैनिक आहेत. ते कुणासमोर झुकणार नाहीत, असं संजय राऊतांनी खडसावून सांगितलं.
काल आणि आज दोन घटना घडल्या आहेत. सूरज चव्हाण हे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत. राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत. हे दोन्ही आमचे प्रमुख नेते निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत. त्यांच्यावर प्रचंड दबाव काही दिवसापासून होता, त्यांच्यावर रवींद्र वायकर रवींद्र वायकर यांच्यावर देखील दबाव आहे. तुम्ही जर शिवसेना सोडून शिंदे गटात आला नाही. तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाई केली जाईल. अशाप्रकारे धमकीचे निरोप येत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.
काल सुरज चव्हाण यांना अटक झाली लोकांच्या चौकशी सुरू आहेत. आम्ही त्यांना सामोरे जाऊ. 138 लोकांना खिचडी वाटत काम देण्यात आलं. मात्र यात किती लोकांच्या चौकशी झाल्या किती लोकांवर ते गुन्हे झाले हे देखील समोर आणावं. किमान 38 अशा कंपन्या आहेत त्यांनी खिचडीचा वाटप केला नाही पण मुंबई महानगरपालिका करून कोट्यावधी रुपयाचे उघडली. पण हे सगळे त्यांचे म्होरके हे शिंदे गटांमध्ये आहेत. भाजपमध्ये आहेत किंवा भाजपशीसंबंधित संस्था आणि एनजीओ आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
सूरज चव्हाण जवळ काम करणारे लोक मिंधे गटात आहेत. म्हणून त्यांना सोडलं. हे पैसे मिंधे गटाकडे गेले. त्यांच्यावर कारवाई केली नाही. राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत. अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत. त्यांच्यावर दबाव येतो. जर तुम्ही आला नाहीत. आमच्याबरोबर तर तुमच्यावर ते अशा प्रकारच्या आणि अटक करू. पण या दबावाला आम्ही बळी पडणार नाही. हेही दिवस बदलणार आहे. आज खोट्या कारवाई करण्यासाठी आज जे पुढे झाले आहेत. ना त्यात हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.