7 आमदारांचा शपथविधी घटनाबाह्य; संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

| Updated on: Oct 16, 2024 | 11:40 AM

Sanjay Raut on Vidhan Parishad MLA Oath : ठाकररे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच विधानसभा निवडणुकीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

7 आमदारांचा शपथविधी घटनाबाह्य; संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल
संजय राऊत, खासदार
Image Credit source: tv9
Follow us on

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. काल निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विधानसभेसोबतच राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांवरही भाष्य केलं आहे. 7 आमदारांचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचं संजय राऊत म्हणालेत. तर राज्यात पुढचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा खेळ भाजपच संपवणार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

विधान परिषद निवडणुकीवर राऊत काय म्हणाले?

काल सात जणांनी घेतलेली शपथ हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका असताना आचारसंहिता जाहीर व्हायच्या. पाच- सहा तास आधी घेतलेल्या निर्णय घटनाबाह्य आहे. ज्या करण्यासाठी तुम्ही आमचे यादीत थांबविली या सात आमदारांच्या बाबतीत शपथ घेतली त्या संदर्भात राज्यपालांनी कुठली माहिती घेतली. त्यातील राजकीय कार्यकर्ते आहेत धर्मगुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

सांगलीमध्ये वंदे मातरम् ला विरोध केलेल्या इद्रीस नाईकवाडी या व्यक्तीला तुम्ही विधानपरिषद आमदार बनवतात. याच माणसाने हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यालयावर हल्ला केला होता. त्याचं नाव देवेंद्र फडणवीस राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत यांचे नाव पाठवतात याची काही नियत आहे. हिंदुत्ववाद आणि राष्ट्रभक्तीवर पिपाणी वाजवण्याची गरज तुम्हाला नाही, असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

राज्यात मविआ सरकार येणार- संजय राऊत

महाविकास आघाडीच नवीन सरकार स्थापन होईल, याबद्दल कोणतीही शंका नाही. सरकार आम्हीच स्थापन करणार आहोत. अमित शाह, भाजपने कोणताही त्याग केला नाही. अमित शाहांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता. भाजपच्या नेत्यांना त्याग, बलिदान शब्द शोभत नाही. भाजपच्या लोकांना महाराष्ट्र कमजोर करायचा आहे. प्रादेशीक अस्मितेचे पक्ष यांना तोडायचे आहेत. महाराष्ट्राची लूट करून त्याला त्याग म्हणणार का?, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.