शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरादार टीका करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. संजय राऊत हे शरद पवारांचा अजेंडा राबवत आहेत. सांगलीच्या जागेवरून मुद्दाम त्यांनी मुद्दाम ख्वाडा घातलाय. हे ते शरद पवारांच्या सांगण्यावरून करतायेत. त्यांनी आम्हाला शिकवू नये. पन्नास खोके आम्हाला काय सांगतो. आम्ही जेव्हा विवस्त्र होऊ तेव्हा तू ये आणि दर्शन घे… संजय राऊतांवर बोलणं घाणीत दगड मारल्यासारखं आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
महायुतीची काल रात्री बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. काही मतदार संघाच्या ज्या अडचणी होत्या. ते तिन्ही नेत्यांनी समजून घेतल्या आणि उचित तोडगा सुद्धा निघालाय. आज मी मुख्यमंत्र्यांकडे माहिती घ्यायला जातोय. आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही नावांची घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1-2 जागांवर नाराजी होती. तिन्ही नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. आग्रह असणं गैर नाही. पण समजूत घालणं, संवाद साधणं गरजेचं असतं. ते या तिन्ही नेत्यांनी केलंय. एखाद्या मतदारसंघात अशी घटना होत असते, असं संजय शिरसाट म्हणाले.
भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. त्यावर त्यांचं जे काही मत असेल ते त्यांनी शिंदे साहेबांकडे मांडावं. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असं नाही, शिरसाट म्हणाले. नाशिकच्या जागेबद्दल वाद असायला नको. गोडसे 2 वेळा खासदार राहिले आहे. त्यांची लीड वाढत गेलीय. आता कोणत्याही जागेवर तिढा असा राहिलेला नाही. भाजप आणि आमच्यात असा कोणता चिंतेचा विषय नाहीये. तिन्ही प्रमुख नेते बसून ठरवतील. आज शिवसेनेची यादी जाहीर होणार आहे, जास्तीत जास्त मतांनी आमचे उमेदवार निवडून येतील, असंही ते म्हणाले.
बऱ्याचश्या ठिकाणाहून जे सर्वे आले ते निगेटिव्ह दाखवण्यात आले. पण तिथले सगळे कार्यकर्ते आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येत आहेत . भेट घेऊन तिथे सांगत आहेत की आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे अशा सर्वांना फार काही जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. येत्या काळात महायुतीच जिंकणार, असं शिरसाट म्हणाले.