गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी मुंबई | 07 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शिव्यांची लाखोली यावेळी वाहण्यात आली आहे. संजय राऊत यांनी घणाघात नाही तर घाण टीका केली आहे. खाली वाकून पाहण्याची त्याची सवय आहे. तुम्ही चोर आहात पण तुमच्यावर कारवाई होणार म्हणून टीका करता. संजय राऊत हरा#*# माणूस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर जात टीका करणारे याआधी आम्ही पाहिले नाहीत. नशिब फक्त नाडी आणि बेल्ट राहीला. त्याखाली काय आहे ते पाहीले नाही, नाहीतर नॅशनल टीव्हीवर तेही सांगतील, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
राज्यसरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीच्या हाती आहे, असा घणाघाती हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या या विधानावरून संजय शिरसाठ यांचा पारा चढला. शिरसाट यांनी संजय राऊत यांना शिवीगाळ केली आहे. संजय राऊत ही राज्याला लागलेली किड, संजय राऊत हा भड#X@ माणूस आहे. जर तो आमच्या साहेबांना अशा भाषेत बोलत असेल तर त्याचा आम्हीही ऊद्धार केल्याशिवाय राहणार नाही, सडेतोड उत्तर मिळेल, असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस मदारी झाले आहेत. हे दोघे माकडं आहेत. फडणवीस डमरू वाजवत आहेत. डम डम डम डम… हे दोघे नाचत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी आज बोलताना केला त्याला संजय शिरसाटांनी उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात. तर मग तुम्ही काय करता? संजय राऊत तुम्ही धोबी का कुत्ता… न घर का ना घाट का… शिंदे फकीर , त्यांना लालच नाही. राज्यसभा उमेदवारी मागताना त्यांनी शिंदेंना मला वाचवा असं म्हणाला होता आणि आता असंच भड#!@ करत राहा, असं म्हणत शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
आरोग्य व्यवस्थेबाबत चौकशी व्हायलाच हवी. पण त्याला राजकीय रंग कशाला देताय. इडी तुमचे सगळे खोके बाहेर काढणार आहे. तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या पाया पडला. शिवसेनेचा कार्यक्रम होतो तेव्हा आम्ही सगळ्यांचे फोटो लावतो, आम्ही तुमच्यासारखे दलाल नाहीत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी राऊतांना उत्तर दिलं आहे.