शरद पवारांनी शिंदेंविरोधात एक ग्रुप अॅक्टिव्ह केला होता; शिवसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप

| Updated on: May 19, 2024 | 4:39 PM

Sanjay Shirsat on Sharad Pawar Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्याबाबतही शिरसाटांनी काही खुलासे केले आहेत. तसंच मुख्यमंत्रिपदाबाबतही संजय शिरसाट यांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...

शरद पवारांनी शिंदेंविरोधात एक ग्रुप अॅक्टिव्ह केला होता; शिवसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
Follow us on

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंविरोधात एक ग्रुप अॅक्टिव्ह केला होता, असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंना पवार साहेबांना कुठंच हरकत न्हवती. हरकत उद्धव ठाकरेची होती. वाहिनीची इच्छा होती तुम्ही मुख्यमंत्री बना म्हणून… त्याला अजय चौधरी, रवींद्र वायकर सपोर्ट केला. या सगळ्याचा मी साक्षीदार आहे, असं संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

युतीवर भाष्य

शिवसेना भाजप युती तुटली. तेव्हा मॅनेजमेंट एकनाथ शिंदेंकडे दिलं होतं. त्यांना सांगण्यात ही आलं होतं की तुला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर हे सर्व काम कर. त्यावेळी खर्च सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यावेळी पोलिसांकडून रेकी सुद्धा करण्यात आली होती. तेव्हा पोलिसांनी सांगितलं की शिंदे साहेब मुख्यमंत्री होताहेत म्हणून रेकी करत आहेत.मात्र स्वार्थ नडला. अजित पवार, सुनील तटकरे, सुनील प्रभू दुसरीकडून एक ग्रुप ऍक्टिव्ह झाला. मग स्वतःचं नाव जाहीर करून घेतलं. प्री प्लॅन करून सगळ झालं मी आय विटनेस आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.

भाजपवाले सारखे यांना फोन करायचे. पण हे फोन सुध्दा उचलत नव्हते. उद्धव ठाकरेंनी अधिकृत चर्चा करण्यासाठी शिंदेंना सहमती देत नव्हते. भाजपचा मुख्यमंत्रीपद द्यायला होकार दिला होता.शरद पवारांनी 5 वर्षे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आश्वासन दिलं होतं. म्हणून उद्धव ठाकरे तिकडे गेले, असा दावाही शिरसाटांनी केला आहे.

शरद पवारांवर टीका

संपूर्ण महाराष्ट्राने फूस पाहिली आहे. एकनाथ शिंदेंनी स्पीडने कामं केलं. त्यांना लोकांना शरद पवारांनी उभ केलं. शरद पवारांना संधी साधता आली नाही, असंही शिरसाट म्हणालेत. भाजपचं कुठं ही ऑब्जेशन नव्हतं. शेवटी साडेसात पर्यंत फोन येत होते. एकनाथ शिंदेसाहेब बोलले. पहिलं मुख्यमंत्री पद द्यायला ते तयार आहेत. त्यावेळी तुला जायचे असेल तर जा असं उद्धव ठाकरे बोलले, असं संजय शिरसाटांनी सांगितलं.