पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या मुलाच्या गाडीने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात जनतेच्या तीव्र भावना आणि संताप व्यक्त झाला. श्रीमंताच्या मुलाच्या या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला जातो. सरकारने यावर कठोर पावले उचलली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी तो नाबलिक असला तरी सज्ञान धरावे असं म्हटलं आहे. मुलाला गादी देणे आणि अमाप पैसे पुरवणे यामुळे चीड निर्माण होते, असं शिरसाट म्हणाले.
एका दिवसाला 48 हजार खर्च झाला. न्यायालयाने दिलेला निकाल मध्ये असा आतापर्यंत असा कधी समोर आला नाही. न्यायालयाने निकाल दिला असला तरी तो काहीना आवडला नाही. त्यांना माफ करता काम नये. प्रकरण निगडित जो असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. प्रकरणात जे जे गुंतले आहेत त्यांना शिक्षा व्हावी. कायद्याचा धाक असावा.शिक्षा व्हावी, असंही संजय शिरसाट म्हणाले.
विशाल आगरवाल याचे जे जे प्रकरण समोर येतात . शिक्षणाच्या वयात दारू पिणे, मारणे गाडीखाली चिरडणं याला ब्रेक द्यायला हवा. अन्यथा तो मुलगा मोठा गुन्हेगार होईल. गाडीखाली जे चिरडले त्याची सहनभुती वाटते आणि वाईटही वाटतं. यात राजकारण येऊ नये. विरोधी पक्षांनी यांना शिक्षा मिळावी यासाठी मदत करावी, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.
पुण्यातील घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हीडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली. यावरही शिरसाटांनी भाष्य केलंय. राहुल गांधी यांनी जे स्टेटमेंट केले तेच आम्ही करतोय. फक्त राहुल गांधी अक्टिंग करून सांगत आहेत. श्रीमंत घरातील मुलगा मस्तवाल होऊन चिरडत असेल आणि त्याला पिक्झा बर्गर देणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. दारू पिऊन कोट्यवधीची पोर्श गाडी चालवणारा कसा नासमज म्हणावा का? यात कुणी कुणी विलंब लावला. त्याला कुणी मदत केली.कोण पोलीस ठाण्यात गेले. त्याला कुणी पाळायला सांगितले याची सर्व माहिती समोर येईल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.