मुंबई : येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहे. (Mumbai School May Not Reopen)
राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.
येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता दिल्लीतील परिस्थिती पाहता 31 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाची स्थिती जर वाढली तर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. काही वेळातच याबाबतच परिपत्रक पालिकेकडून जारी केले जाणार आहे.
दरम्यान शाळा सुरु होणार असल्याने मुंबई विभागातील महापालिका आणि इतर खासगी शाळांमधील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वार्डनिहाय अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. शिक्षकांसोबतच सुरक्षारक्षक, क्लार्क आणि सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही चाचणी होत आहे. मुंबईत राहणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य केंद्रावर ही चाचणी करता येणार आहे. यावेळी शिक्षकांना आधारकार्ड आणि शाळेचे ओळखपत्र असणे गरजेचे असणार आहे.
येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शाळांची स्वछता आणि खबरदारीच्या उपायांची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाकडे दिली आहे. यानुसार सर्व शाळेत सॅनिटायझेशनसाठी सॅनिटाईजर पुरवणे, विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, ऑक्सिमीटर आणि इतर साहित्य महापालिकेतर्फे पुरवण्यात येणार आहे. (Mumbai School May Not Reopen)
Breaking: मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार, महापालिका आयुक्तांचे आदेश https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/rcucER5A0g
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
संबंधित बातम्या :
मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय