मुंबई : मुंबईतील (Mumbai) कर्नाक बंदर पूलाची मुंबई महापालिकेकडून (BMC) पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. परंतु या पुनर्बांधणी आधी जुना पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पाडकामादरम्यान अडथळा ठरणारे स्टॉल आणि व्यायामशाळा पालिका तोडणार आहे. यामुळे आता याविरोधात विभागतील नागरिक आक्रमक होत रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. आयआयटी मुंबई (IIT Mumbai) आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त पाहणीत कर्नाक पुल धोकादायक ठरवण्यात आलेला आहे. हा पूल पाडून याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पूल बंद करण्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या काही दिवसात कर्नाक पूल पाडकामाला सुरुवात होईल, असे मध्य रेल्वेनं कळवले आहे. दरम्यान, या सर्व कामात मोठा गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा विरोधही होण्याची शक्यता आहे.
पूल बंद करण्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या काही दिवसात कर्नाक पूल पाडकामाला सुरुवात होईल, असे मध्य रेल्वेनं कळवले आहे. दरम्यान, या सर्व कामात मोठा गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा विरोधही होण्याची शक्यता आहे.
वाहतूक नियोजनासाठी 70 वॉर्डन आणि वाहतूक पोलिसांनी मागणी केलेले सहित्य उपलब्ध करून घ्यावे, अशी सूचना मध्य रेल्वेने महापालिकेला केली आहे. येत्या काही दिवसात मदतनीस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.