मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत परतण्यास स्पष्ट नकार दिला आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झालेले एकनाथ शिंदे सुरत, अहमदाबादनंतर आसामधील गुवाहाटीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9ला प्रतिक्रिया देताना महत्त्वाच्या निर्णयांचा उलगडा केला आहे. हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष सवाल उपस्थित केला आहे. परतीचे दोर कापले असल्याचेही स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. आपल्याकडे आमदारांचे संख्याबळ अधिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अर्थात संख्याबळ सिद्ध होईपर्यंत घटनेनुसार याबाबत कोणताही राजकीय निर्णय होऊ शकत नाही. मात्र आज दुपारपर्यंत एकनाथ शिंदे हवाईमार्गे थेट राजभवनात (Raj Bhavan) येणार असल्याची माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9सोबत साधलेल्या संवादातील पाच ठळक मुद्दे पाहू…