मुंबई : नववर्षाच्या निमित्ताने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करु नये, असे आवाहन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. 31 डिसेंबरला रात्री दारु पिऊन गाडी चालवू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मुंबई पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहे. त्यामुळे जर कोणी रस्त्यावर दारु पिऊन गाडी चालवली, तर त्याची थेट रुग्णालयात पाठवून ब्लड टेस्ट केली जाणार आहे. (Mumbai Traffic Police on Watch Drink-Drive case During New Year Celebration)
दरवर्षीप्रमाणेही यंदाही थर्टीफर्स्टसाठी वाहतूक पोलीस सज्ज असणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ब्रीथ एनलायझरने कोणत्याही चालकाची तपासणी केली जाणार नाही. पण जर पोलिसांना एखाद्यावर संशय आला, तर त्याची थेट रुग्णालयात रक्त तपासणी केली जाणार आहे. यावेळी जर त्याच्या रक्तात दारु आढळली तर त्या चालकासोबतच गाडीतील इतरांवरही कारवाई केली जाणार आहे.
दरवर्षी थर्टी फर्स्टच्या दिवशी ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवली जाते. यात ब्रीथ एनालायझरने कोणी मद्यपान केलं आहे की नाही याची चाचणी केली जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर कोणी दारु पिऊन गाडी चालवत आहे, असा संशय वाहतूक पोलिसांना आला, तर पोलीस थेट त्या चालकाला रुग्णालयात पाठवणार आहे.
त्यानंतर त्या ठिकाणी चालकाची ब्लड टेस्ट करून मद्यपान केलं आहे की नाही, याची तपासणी होईल. जर रिपोर्टमध्ये तो मद्यपान केलेल्याचं समोर आलं, तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरी जावं लागेल. विशेष म्हणजे मद्यपान करुन गाडी चालवण्यावरच नाही तर गाडीत सोबत असलेल्यांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
यंदा 31 डिसेंबरच्या रात्री ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहिम यशस्वीपणे राबवण्यासाठी ट्रॅफिक विभागाकडून 94 टीम बनवण्यात आल्या आहेत. यातील 3000 ट्रॅफिक कर्मचारी यंदा 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईच्या रस्त्यांवर असतील. यंदाही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासोबत मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, गर्दी होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, यासाठी मुंबई पोलिसांच्या 35000 पेक्षा जास्त पोलीस बल रस्त्यावर असणार आहे. (Mumbai Traffic Police on Watch Drink-Drive case During New Year Celebration)
संबंधित बातम्या :
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी तासाला 800 भाविकांना घेता येणार सिद्धीविनायकाचे दर्शन!
MPL ची सूत्रं स्वीकारताच मिलिंद नार्वेकरांची बॅटिंग, ठाकरे-पवारांच्या फोटोसह होर्डिंगबाजी