मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली (highway flyover new speed limit) आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी वेगमर्यादेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. दरम्यान आधीच्या वेगमर्यादेच्या तुलनेत मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरील वेगमर्यादा कमी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी वेगमर्यादा वाढवण्यात आली (highway flyover new speed limit) आहे.
वेगमर्यादा बदलण्यात आलेले मुख्य मार्ग
1) नेताजी सुभाषचंद्र मार्ग – 65
2) वांद्रे वरळी सी लिंक – 80
3) पश्चिम द्रुतगती मार्ग – 70
4) पूर्व द्रुतगती मार्ग – 70
5) सायन पनवेल द्रुतगती मार्ग – 70
6) सांताक्रूझ चेंबूर लिंक (SCLR) रोड – 70
7) जे जे उड्डाण पूल – 60
8) ईस्टर्न फ्रीवे – 80
9) लालबाग उड्डाण पूल – 70
10) जगननाथ शंकर सेठ उड्डाण पूल दादर – 70
11) नानालाल उड्डाण पूल माटुंगा – 70
मुंबईची लोकसंख्या जवळपास 2 कोटी आहे. तर रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या ही आटोक्याच्या बाहेर जात आहे. त्याचा प्रभाव मुंबईवर पडत आहे.
मुंबईकरांना कार्याकालीन वेळ वगळता रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे केंद्र सरकारच्या 2018 च्या नोटीफिकेशनला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला (highway flyover new speed limit) आहे.