मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात लहान तलाव अशी ओळख असलेला तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास हा तलाव पूर्ण भरुन वाहू लागला. मुंबई महानगरपालिकेने याबाबतची माहिती दिली. (Mumbai Tulsi Lake Overflow)
तुळशी तलाव हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करत असून तो पालिका क्षेत्रात येतो. या तलावाची क्षमता 8046 दशलक्ष लीटर इतकी आहे. हा तलाव गेल्यावर्षी 12 जुलैला भरला होता. तर त्याआधी 9 जुलै 2018, 14 ऑगस्ट 2017 रोजी ओसंडून वाहू लागला होता.
मुंबईकरासाठी आनंदाची बातमी, मुंबईकरांची तहान भागवणारा आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात लहान असलेला तुळसी तलाव भरुन वाहू लागला #Tulsi @mybmc pic.twitter.com/68SlJ7xXLx
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2020
मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
तुळशी तलावाबाबत काही माहिती
संबंधित बातम्या :
मुंबईत अवघ्या 30 लाखात घर, ठाकरे सरकारची योजना, ऑक्टोबरमध्ये भूमीपूजन?
इमारतीचा पुनर्विकास तीन वर्षात न केल्यास ‘एनओसी’ रद्द, ठाकरे सरकार दणका देण्याच्या तयारीत