भारत बंद झाला तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

| Updated on: Aug 24, 2024 | 12:30 PM

Uddhav Thackeray on Band and Nishedh Andolan : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना भवनसमोर महाविकास आघाडी निषेध आंदोलन करत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरलं. वाचा सविस्तर...

भारत बंद झाला तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
उद्धव ठाकरे
Image Credit source: ANI
Follow us on

बदलापूरमधील बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटने विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्रबंदची हाक दिली होती. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली होती. मात्र या बंदच्या विकरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर हा बंद बेकायदेशीकर असल्याचं न्यायालयाने म्हटलं. शिवाय बंद पाळण्यात आल्यास त्यावर कायदेशीर कारवाईचे आदेशही न्यायालयाकडून म्हणण्यात आलं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून आज राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील शिवसेना भवनसमोर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. तेव्हा भारत बंद झाला तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?, असा सवाल त्यांनी केलाय.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

अजूनही महाराष्ट्रात जिवंत मनं आहेत. ते तुम्ही दाखवून दिलं. जे उद्दाम सरकार घटनाबाह्य सरकार राज्य करत आहे. त्या सरकारची किव येते. नराधमांवर पांघरून घालण्याचं त्यांना पाठिशी घालण्याचं काम सुरू आहे. सरकारने खणखणीत बाजू घ्यायला पाहिजे होती. पण जेव्हा दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नसतो. आपण महाराष्ट्र बंद पुकारला होता. हा बंद कडकडीत झाला असता. याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही. निर्ढावलेलं सरकार आहे. राज्यावर राज्य करत आहे. बंद कडकडीत होणार अंदाज आला तेव्हा त्यांचे चेलेचपाटे कोर्टात पाठवले अन् कोर्टाकडून बंदला अडथळा केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोर्टाच्या निर्णयावर म्हणाले…

मी काल कोर्टाला धन्यवाद दिला. आपली केस सर्वोच्च न्यायालयात अडीच वर्ष सुरू आहे. न्याय मिळेल याचा विश्वास आहे. पण कोर्ट त्वरेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं याचं अभिनंदन करतो. कोर्टाने ठरवलं तर निर्णय घेऊ शकतं. बंदला बंदी केली असली तरी राज्यातील प्रत्येक हृदयात तुमच्या विरोधात मशाल धगधगत आहे. महिलांना सुरक्षा पाहिजे म्हणून बंद केला. त्यात अडथळा आणला. गेल्या आठवड्यात भारत बंद झाला. इतर राज्यात रेल्वेही बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिका कर्ते कुठे गेले होते. तेव्हा बंदला विरोध केला नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.