आपण जिंकलेलो आहोत. आपण उत्तमरित्या ही आघाडी सांभाळली आहे. समोर उमेदवार कोण? की ज्याच्यावर उमेदवारी सुरू आहे. मला तर असं कळलं की, ग्रामीण भागात जे पैसे वाटले ते नकली होते. खरंतर ही माणसंच नकली आहेत. त्याकाळी अरविंद सावंत यांना सांगितलं होतं.अरविंद तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे. अरविंद यांनी एक शब्द न उच्चारता म्हणाले येस सर… आणि त्यांनी त्यांचा राजीनामा मोदींच्या तोंडावर फेकला…, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आजच्या मुंबईतील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
आज एक भयंकर बातमी आली आहे. जे. पी. नड्डा यांनी म्हटलं की आजपर्यंत आम्हाला संघाची गरज होती. आता ती गरज नाहीये. आपल्यावर टीका करतात की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार. ती होणार नाही. मात्र ज्या आरएसएसने तुम्हाला जन्म दिला तुम्ही त्यावर बंदी का घालता?, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आता अरविंद सावंत यांच्याबद्दल देखील वावड्या उठता आहेत. अरे पण त्यांना जायचं असत तर केव्हाच गेला असता. मात्र तुम्हाला धडा शिकवायला तो उभा आहे. आता मी मुंबा देवीला जाणार आहे. मुंबईला जे सुरतचे दोन चोर लुटतात. त्यांना गडायचं आहे यासाठी मी जाणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
काँग्रेसचा जाहीरनामा हे माओवादी आहे, असं भाजपवाले म्हणतात. मुस्लिम धार्जिणा आहे म्हणतात. मात्र भाजपचा जाहीरनामा हा खाओवादी आहे… भ्रष्टाचारी तर भ्रष्टाचारी मात्र कडीवर खेळवायला. आम्ही नरेंद्र मोदी यांना आणि अमित शाह यांना आमंत्रण देत आहे. 4 जून नंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आहे. यासाठी तुम्हाला आमंत्रण देत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी या सभेत म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य जर मिध्यांच्या हातात राहील तर गुंडाराज येईल, तुम्हाला हवा आहे गुंड राज? अजून सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही. एक बसला होता काळ्या टोपीवाला… त्याने हे सर्व केलं. निवडणूक आयोग अधिकारी आम्ही बदलवून टाकू. हो मी म्हणतोय यांना गाडायचं आहे. यांनी कोरोना काळात गंगेमध्ये जे प्रेत सोडली. तेव्हा मोदीजी तुम्ही गंगेचे अश्रू पुसायला गेले होते का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.