मुंबई | 13 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर संवाद साधला. राम मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या उद्धाटनावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत असतात. याच कार्यक्रमावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींना टोला लगावला आहे. तसंच चर्चेचं आवाहन केलं आहे.
राम मंदिराचं उद्धाटन होणार आहे. याचा सगळ्यांनाच आनंद आहे. या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलंय. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा. पण त्यानंतर देशाचं जे दिवाळं निघणार आहे. त्यावरही चर्चा करा. चाय पे चर्चा करा किंवा कॉफी पे चर्चा करा. बिस्कीट ढोकळा कशावरही चर्चा करा पण या मुद्द्यावर चर्चा करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे.
येत्या 22 जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. 23 जानेवारी शिबिर आणि त्यानंतर जाहिर सभा होईल कार्यक्रम अगोदर जाहीर केला. 22 तारखेला प्रभू रामचंद्र सितामाई हनुमान तिथं असतील. आताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल सोमनाथचं मंदिर होतं. आम्ही काळाराम मंदिरात जात आहोत त्यासाठी आम्ही राष्ट्रपती यांना आमंत्रित करत आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही राष्ट्रपती महोदयांना आम्ही आमंत्रण देत आहोत तसेच आमचे खासदार जाऊन देखील त्यांना आमंत्रण देतील. सोमनाथ मंदिराची प्राण प्रतीष्ठा ही राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते केलं होतं. राम मंदिराचं हे शंकराचार्य यांना आमंत्रण आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जर तिकडे आमंत्रण असेल तर त्यांच्या हस्ते पूजा व्हावी. कोणी राजकीय नेत्यांचे हस्ते होऊ नये. मी कडवट हिंदू आहे राममंदिर व्हावं ही आमची देखील इच्छा होती. आता ते मंदिर होतंय. त्याचं उद्धघाटन राष्ट्पतींच्या हस्ते व्हावं, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.