वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होताच उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद; म्हणाले, आम्ही…

| Updated on: Apr 26, 2024 | 4:29 PM

Uddhav Thackeray on Varsha Gaikwad Candidacy : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद काही वेळाआधी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं. यावेळी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होताच उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद; म्हणाले, आम्ही...
उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबईतील मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. महाविकास आघाडीत उत्तर-मध्य मुंबई ही जागा काँग्रेसकडे गेली आहे. या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही वेळाआधी पत्रकार परिषद घेतली. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यावर भावना काय व्यक्त करायच्या? त्यांना खासदार करून दिल्लीला पाठवणार. देशात हुकूमशाही येता कामा नये. महाराष्ट्रामध्ये मविआ आणि देशात इंडिया आली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

वर्षा गायकवाड यांना मी मतदान करणार आहे. पहिल्यांदा जरी हातावर मतदान करू तरी त्यांच्या हातात मशाल आहे. वर्षा गायकवाड यांच्यासाठी नवखा मतदारसंघ नाही आहे. ठाकरे साहेबांचे आभार मानते. त्यांच्या मंत्रिमंडळात मी काम केलं आहे. मविआ म्हणून एका सिट पूर्त बोलणार नाही. 2004 पुन्हा रिपीट होईल याची मला खात्री आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उत्तर मुंबईत कुणाला उमेदवारी मिळणार? याची लवकरच त्याचं उत्तर मिळेल, असंही ते म्हणाले.

गेल्या 2-3 दिवसात क्लीन चिट देण्यात आली. कालपर्यंत ज्यांच्यावर आरोप झाले. त्यांना आता क्लीन चिट कशी मिळाली. जाऊ द्या त्याच्या बदल संजय राऊत बोलले आहेत. मी परवा सांगलीत चाललो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय दीना पाटील उमेदवारी अर्ज कधी भरणार?

संजय दीना पाटील यांनीही आपल्या उमेदवारीवर भाष्य केलं. या वास्तूत फॉर्म मिळाला आहे ते महत्वाचं आहे. तिकडे आधी काम केलं. पवारसाहेबांचा आशीर्वाद आहे. मित्र पक्ष सोबत आहे. चांगल्या प्रकारे निवडून येऊ. मुंबईचे प्रश्न सोडवू विश्वास आहे. मी मोठा नेता नाही आहे. आतापर्यंत भाजपचे खासदार शिवसेनेमुळे जिंकून येत होते. जे कार्यकर्ते आहेत ते उद्धव साहेबसोबत आहेत. 30 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही उमेदवारी अर्ज भरू, असं संजय दीना पाटील म्हणाले.