राज्यात विधानसभा निवडणुकीची राणधुमाळी सुरु झाली आहे. अवघ्या काही दिवसात निवडणुकीची घोषणा होईल. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाने नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘मशाल’ हाती दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ऑडिओ स्वरूपात आहे. प्रसिद्ध गायक नंदेश यांनी ‘मशाल’ हाती दे’ हे गाणं गायलं आहे. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. देवीला साकडं घालणारं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या गोंधळ गीताचं अनावरण झालं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. तसंच हे गीत लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना राज्यभरातील शिवसैनिकांना केल्या.
दार उघड बये दार उघड
सत्वरी भुवरी ये गं अंबे
सत्वरी भुवरी ये…
आदिमाये तू ये, आदिशक्ती ये
आसूरांचा संहार करण्यासाठी
मशाल हाती दे
सत्वरी भूवरी ये गं अंबे…
उधे उधे उधे….
गोंधळ गीत !
असुरांचा संहार कराया
मशाल हाती दे..
सतवरी भूवरी ये ग अंबे..
सतवरी भूवरी ये.. pic.twitter.com/r9OUXpmtpG— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 3, 2024
आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे आजची राजकीय पत्रकार परिषद नाही. राज्यात जे अराजक माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. असंच अराजक शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर आलं होतं. तेव्हा एकनाथांनी बये दार उघड आरोळी मारली होती. या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं ऑडिओ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नंदेश उमप यांनी हे गाणं गायलं आहे. त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरचं त्यांचं पहिलं गाणं आहे. त्यांचा पहाडी आवाज तसाच आहे. श्रीरंग गोडबोले आणि नंदेश उमप यांनी या गाण्यात जान ओतली आहे. संगीतकार आज कामामुळे आले नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी या गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात सांगितलं.