पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर, मुंबईतील सर्व कॉलेजचा कटऑफ नव्वदी पार

| Updated on: Jun 17, 2019 | 11:29 PM

यंदाच्या शैक्षणिक वर्षात मुंबईतील नामवंत कॉलेजचे कटऑफ हे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट होतं आहे. विशेष म्हणजे सेल्फ फायनान्स विभागाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचंही स्पष्ट होत आहे.

पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर, मुंबईतील सर्व कॉलेजचा कटऑफ नव्वदी पार
Follow us on

मुंबई : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज (17 जून) प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या यादीत बीकॉम, बीएससी या पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच सेल्फ फायनान्स म्हणजे बीएमएम, बीएमएस, बीबीआय यांसारख्या अभ्यासक्रमाचा कटऑफ जास्त असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे यंदाही पहिल्या गुणवत्ता यादीचा कटऑफ नव्वदीपार असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी 29 मे पासून सुरु करण्यात आली. या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीसाठी एकूण 2 लाख 62 हजार 128 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर विविध अभ्यासक्रमांसाठी 7 लाख 83 हजार 896 विद्यार्थ्यांनी एवढे अर्ज केले होते. यानुसार प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध झाली.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात मुंबईतील नामवंत कॉलेजचे कटऑफ हे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट होतं आहे. विशेष म्हणजे सेल्फ फायनान्स विभागाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचंही स्पष्ट होत आहे. त्याशिवाय बीएमएम, बीएफएम, बीएमएस या अभ्यासक्रमांच्या कट ऑफमध्येही दरवर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर बीकॉम, बीए, बीएससी या पारंपारिक अभ्यासक्रमांचा कटऑफही काही प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे.

विल्सन कॉलेज

बीएमएस

आर्टस – 87.7 टक्के

कॉर्मस – 92.4 टक्के

सायन्स – 90 टक्के

बीएमएम

आर्टस – 93 टक्के

कॉर्मस – 93.6 टक्के

सायन्स – 90.6 टक्के

बीएएफ – 90 टक्के

बीएससी आयटी – 76.31 टक्के

बीए – 85

बीएससी – 70 टक्के

झेवियर्स कॉलेज

बी.ए – 92.31 टक्के

बीएससी आयटी – 95 टक्के

बीएससी (बायलॉजीकल सायन्स)–  77.08 टक्के

बीएमएस– 80.13 टक्के

बीएमएम – 81.88 टक्के

रुईया कॉलेज

बीएमएम

आर्ट्स – 93.2 टक्के

कॉमर्स 90.8 टक्के

सायन्स – 93.6 टक्के

बी.ए – 95.8 टक्के

बीएससी – 86.31 टक्के

एच आर कॉलेज

बी.कॉम – 96 टक्के

बीएमएम

आर्टस – 94.20 टक्के

कॉमर्स – 93.20 टक्के

सायन्स – 92 टक्के

बीएमएस

आर्ट्स – 90.40 टक्के

कॉमर्स – 95.60 टक्के

सायन्स – 91.40 टक्के

मिठीबाई कॉलेज

बी.ए – 96 टक्के

बी कॉम – 89.69 टक्के

बीएमएस

आर्टस – 91.17 टक्के

कॉमर्स – 95.60 टक्के

सायन्स – 91.67 टक्के

बीएमएम

आर्ट्स 94.67 टक्के

कॉमर्स – 93.40 टक्के

सायन्स – 92.17 टक्के

बीएएफ

आर्टस – 95.20 टक्के

रुपारेल कॉलेज

बी कॉम – 82.76 टक्के

बीएमएस

आर्टस – 76.46 टक्के

कॉमर्स 84.30 टक्के

सायन्स 79.23 टक्के

संबंधित बातम्या :

MSBSHSE HSC Result 2019 mahresult.nic.in : बारावीचा निकाल 85.88 टक्के

EXCLUSIVE | SSC Result mahresult.nic.in : दहावीच्या 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण