मुंबई: शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येऊन बरेच दिवस उलटल्यानंतही निर्बंध शिथील न झाल्यामुळे मुंबईतील व्यापारी वर्ग (Traders) ठाकरे सरकारवर नाराज झाला आहे. ‘ब्रेक द चेन’च्या नियमावलीत मुंबईचा (Mumbai) समावेश तातडीने दुसऱ्या स्तरात करावा. जेणेकरून व्यापाऱ्यांना अधिक मोकळीक मिळेल, असे वक्तव्य एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केला आहे. (Shopkeepers and traders are not happy with Coroanvirus restrictions in Mumbai)
मुंबईतील कोरोना परिस्थिती ही पहिल्या टप्प्याची असताना शहरात तिसऱ्या स्तराचे निर्बंध का लागू आहेत, असा सवालही विरेन शाह यांनी विचारला. नवी मुंबई आणि ठाण्यात व्यापारावरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, मुंबईतील व्यापारी निर्बंधांमुळे खड्ड्यात जात आहे. हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदारांचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे, असेही विरेन शाह यांनी म्हटले.
मुंबईत पॉझिटिव्हीटी रेट लेव्हल 1 आणि ऑक्सिजन बेडसचे प्रमाण लेव्हल 2 प्रमाणेच्या निकषांप्रमाणे असले तरी सावधगिरी म्हणून मुंबईत अद्याप लेव्हल 3 मधील निर्बंध लागू आहेत. लोकल ट्रेन सामान्यांसाठी सुरु करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला जाईल, असे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले. त्यासाठी रविवारी एक बैठक पार पडणार आहे.
राज्यात आजपासून (19 जून) 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणास सुरुवात होत आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केलाय. त्याप्रमाणे 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
संबंधित बातम्या:
राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण आजपासून सुरू
देशात 1 लाख फ्रंटलाइन वर्कर तयार होणार, सरकार प्रशिक्षणासोबत पैसेही देणार, वाचा सविस्तर
(Shopkeepers and traders are not happy with Coroanvirus restrictions in Mumbai)