लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे जळगावचे खासदार उन्मेश पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.उद्या 12 वाजता भाजप खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिवबंधन ते हाती बांधणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाने जळगावात भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेश पाटील यांनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जळगावातून त्यांची उनेदवारी निश्चित झाल्याचीही माहिती आहे. काही वेळाआधी त्यांनी संजय राऊतांचीही भेट घेतली आहे.
भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि इथूनच उन्मेश पाटील यांची नाराजी सुरू झाली. विद्यमान खासदार असताना पक्षाने तिकीट नाकारल्याने उन्मेश पाटील नाराज झाले. आता ते उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील. उन्मेश पाटील हे आता जळगाव लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असणार आहेत.
संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उन्मेश पाटील यांना माध्यमांशी त्यांची भूमिका विचारली. त्यावरमी आरामात माध्यमांशी बोलेन. आता माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही. मी उद्या सकाळी तुमच्यासाठी बोलेन. मी तुमचा सगळ्यांचा आदर करतो पण मी तुमच्याशी नंतर बोलेन. मी आणि संजय राऊत साहेब मागच्या अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतो. आम्ही एकत्र संसदेत होतो. आमची चांगली मैत्री आहे. काही गोष्टी राजकारण पलिकडे असतात. ही भेट तशीच होती, असं उन्मेश पाटील म्हणाले.
जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्याने उन्मेश पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. शिवाय जळगावमधून उन्मेश पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील,अशी माहिती आहे.