मुंबई : मुंबई महापालिकेने सर्वाधिक ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळलेले मुंबईतील विभाग ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर केले आहेत. तब्बल सात वॉर्डमध्ये प्रत्येकी 50 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 11 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार ‘जी दक्षिण’मध्ये 246 रुग्ण आहेत. (Mumbai Ward wise Corona Hot spot)
‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. या दोन्ही प्रभागांमध्ये प्रत्येकी 100 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. ‘ई’ वॉर्ड मध्ये 111 रुग्ण आहेत.
‘डी’ वॉर्ड तिसऱ्या क्रमांकावर असून, इथे 94 रुग्ण आहेत. ‘एम पूर्व’ वॉर्डमध्ये गेल्या पाच दिवसात विलक्षण वाढ झाली आहे. इथे तब्बल 70 कोरोनाग्रस्त आहेत. ‘एच पूर्व’ या विभागामध्ये 67, तर ‘के पूर्व’ मध्ये 61 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ‘एल’ वॉर्डमध्ये 57 इतकी रुग्णसंख्या आहे.
महापालिका विभाग – मनपा प्रशासकीय रचनेनुसार त्यात येणारे भाग
1. जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड
2. ई – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर
3. डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली
4. एम पूर्व – देवनार, चेंबूर, शिवाजीनगर
5.एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व
6. के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व
7. एल – चुनाभट्टी, कुर्ला
कुठे किती रुग्ण? (Mumbai Ward wise Corona Hot spot)
जी दक्षिण – 246
ई – 111
डी – 94
एम पूर्व – 70
एच पूर्व – 67
के पश्चिम – 61
एल – 57
जी उत्तर – 9
के पूर्व – 44
पी उत्तर – 43
एम पश्चिम – 40
एफ उत्तर – 39
एफ दक्षिण – 38
दक्षिण – 37
आर दक्षिण – 27
एच पश्चिम – 26
उत्तर – 25
पी दक्षिण – 24
आर मध्य – 21
बी – 20
आर उत्तर – 13
ए – 12
मध्य – 10
टी – 09
As on 11-Apr l Positives at Wards
Our @mybmc & @MumbaiPolice teams are giving their all to take care, protect & secure everyone in these times.
We appeal everyone to #StayHomeStaySafe & thereby #HelpUsHelpYou#BlessedToServe#AnythingForMumbai#NaToCorona https://t.co/vkmCjrOEmE pic.twitter.com/yNlH5kYr0z
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 12, 2020