मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातलेला असतानाच मुंबईकर कुटुंबाला याचा अप्रत्यक्ष फटका बसला आहे. विमानात मृत्युमुखी पडलेल्या आईचा मृतदेह चीनहून मायदेशी आणण्यासाठी मेहरा कुटुंब 20 दिवसांपासून प्रतीक्षा करत (Mumbai Woman Dead body at China) आहे. भारत-चीन विमानांची ये-जा बंद असल्यामुळे मेहरा कुटुंबाने परराष्ट्र मंत्रालयाकडे साकडं घातलं आहे.
मुंबईतील वांद्र्यामध्ये राहणारे डॉ. पुनित मेहरा उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुनित यांना मुंबईला आणण्यासाठी त्यांच्या 63 वर्षीय मातोश्री रिटा राजेंद्र मेहरा मेलबर्नला गेल्या.
24 जानेवारी 2020 रोजी मेहरा मायलेक ‘एअर चायना’च्या विमानाने बीजिंगमार्गे मुंबईला निघाले. परतीच्या प्रवासात रिटा विमानात बाथरुममध्ये गेल्या. मात्र बराच वेळ उलटूनही आई परत न आल्यामुळे पुनित यांना शंका आली. त्यांनी पाहणी केली असता रिटा विमानातील बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळल्या.
हेही वाचा : कोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित!
रिटा यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी विमानाचं चीनच्या झेंगझोऊ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मात्र रिटा मेहरा यांची प्राणज्योत मालवली.
7 फेब्रुवारी रोजी डॉ. पुनित भारतात परत आले. मात्र त्यांच्या आईचं पार्थिव आजही झेंगझोऊमधील शवगृहात ठेवण्यात आलं आहे. चीनमधील परिस्थिती गंभीर असल्याने पार्थिव आणण्यात विलंब होत असल्याचं डॉ. पुनित यांनी सांगितलं. त्यामुळे आपल्या आईचं पार्थिव कधी मायदेशी येणार, याची वाट शोकाकुल मेहरा परिवार वाट पाहत आहे.
Puneet Mehra: Due to some reason transportation process could not be initiated, I do not know if it was due to coronavirus. It has been so long & my mother’s mortal remains are not yet back, I do not know what state she is in. I appeal to PM & government to bring her back. https://t.co/xTnohMFnBg pic.twitter.com/ZaP4FrhDPP
— ANI (@ANI) February 17, 2020
Mumbai Woman Dead body at China