अंबरनाथ : महाराष्ट्रात (MAHARASHTRA NEWS) काल गटारी निमित्त अनेकांनी पर्यटन ठिकाणी गर्दी केली होती.धबधब्याजवळ (AMBERNATH WATERFALL) अनेक दुर्घटना काल घडल्या आहेत. विशेष म्हणजे अनेकांचा मृत्यू हा पाण्यात बुडाल्यामुळं झाला आहे. मुंबईतल्या आजूबाजूच्या परिसरात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुट्टीच्या दिवशी अनेकदा गर्दी पाहायला मिळते. त्याच अनुशंगाने अंबरनाथ (AMBARNATH TOURIST BAN) तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. यापुढे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. ३०ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे अशी माहिती अंबरनाथच्या नायब तहसीलदार दीपक अनारे यांनी दिली आहे.
मुंबईतील अनेक पर्यटकांची शेजारी असलेल्या पर्यटनस्थळी सुट्टीच्या दिवशी भेट असते. दोन महिन्यात पर्यटक अधिक असतात, त्याचवेळी दुर्घटना सुध्दा अधिक घडत असतात. अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर, भोज धरण, बारवी नदी, चिखलोली अशी जवकल्पास दहा ते बारा पर्यटन क्षेत्र आहेत. या परिसरात मुंबई, ठाणे इथून अधिक पर्यटक येत असतात.
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्या परिसरात मद्यपान करणाऱ्या अनेक तरुणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसात अनेकांचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासनाने पर्यटन स्थळी जाण्यास बंदी घातली आहे. विशेष म्हणजे ३० ऑगस्टपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. पर्यटन स्थळाच्या तीन किलोमीटर परिसरात सापडल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहीती दीपक अनारे ,नायब तहसीलदार ,अंबरनाथ यांनी जाहीर केली आहे.