नालासोपाऱ्यात सहा वर्षीय मुलाचा गटारात पडून मृत्यू

| Updated on: Sep 05, 2019 | 10:24 AM

मुसळधार पावसामुळे (Heavy rain in vasai) नालासोपाऱ्यात सर्वत्र पाणी साचले होते. याच पाण्यात खेळता खेळता सहा वर्षीय मुलाचा गटारात (boy fall in gutter) पडून मृत्यू झाला आहे.

नालासोपाऱ्यात सहा वर्षीय मुलाचा गटारात पडून मृत्यू
Follow us on

नालासोपारा : मुसळधार पावसामुळे (Heavy rain in vasai) नालासोपाऱ्यात सर्वत्र पाणी साचले होते. याच पाण्यात खेळता खेळता सहा वर्षीय मुलाचा गटारात (boy fall in gutter) पडून मृत्यू झाला आहे. काल (4 सप्टेंबर) संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली. अबू बकार झफार खान असे या 6 वर्षीय मुलाचे नाव आहे.

वसई, विरार, पालघरमध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे नालासोपाऱ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अबू याच पावसात नालासोपाऱ्यातील संतोष भुवन येथे बनारस हॉटेलसमोर खेळत होता. त्याच्यासोबत तीन वर्षांची त्याची बहीणही खेळत होती. मात्र खेळता खेळता अचानक अबू गटारात पडला आणि वाहून गेला. त्याचवेळी बाजूच्या एका मुलाने त्याला गटारात पडताना पाहिले.


त्या मुलाने ही संपूर्ण घटना अबूच्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर वसई विरारमधील अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि स्थानिक रहिवाशी यांनी एकत्रित त्या मुलाचं शोधकार्य सुरु केलं.

त्यानंतर रात्री उशिरा नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे गटारात वाहून गेलेल्या अबू मृतदेह वसईच्या एव्हरशाईन सिटीच्या नाल्यात सापडला.