राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. मतदानाच्या एक दिवस अगोदरच मोठे कांड झाले. पैसे वाटपाचा आरोप, उमेदवारांवर हल्ले करण्यात आले. बिटकॉईन वादावर अखेर मौन सोडले आहे. काल भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करण्यासाठी आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर लागलीच भाजप गोटातून काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार करण्यात आला.
मी तर शेतकरी मुलगा
बिटकॉईन वादावर नाना पटोले यांनी बिटकॉईन वादावर मौन सोडले. भाजपाने मतदानाच्या एक दिवस अगोदर माझ्यावर चुकीचे आरोप लावले आहेत. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला बिटकॉईन काय आहे हे समजत नाही. मी या सर्व प्रकाराविरोधात मानहानीची तक्रार देणार आहे. भाजपाच्या नेत्यांवर मी अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. भाजपाकडून मला अशी अपेक्षा नव्हती, असे ते म्हणाले. भाजपाने नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांनी बिटकॉईन व्यवहाराचा आरोप केला आहे.
ती ऑडिओ क्लिप तपासा
तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पण या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमात व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नसल्याचा दावा त्यांनी केला. सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणात सायबर क्राइम सेलला तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिल्याचे सांगीतले.
तर अजित पवार यांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. याविषयीचे वृत्त पाहीले आहे. पटोले यांना अनेक दिवसांपासून ओळखतो. त्यांचा आवाज ओळखतो. पण आताच याविषयी काही बोलू शकत नाही. कारण काही लोक नकली आवाज सुद्धा काढतात. ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या आवाजातील या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्यात यावी असे ते म्हणाले. राज्याच्या राजकारणात का होईना याप्रकारे बिटकॉईनने पहिल्यांदा प्रवेश केल्याची चर्चा होत आहे.