मुंबई : संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर नारायण राणे यांनी २४ तासांच्या आत पटलवार केला. राणे यांनीसुद्धा राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. ऐकमेकांची भाषा पाहून घेण्यापर्यंत पोहचली आहे. संजय राऊत तू जिथं म्हणशील तिथं यायला मी तयार आहे. आजच्या राजकारणात संजय राऊत हा जोकर आहे, अशी टीका नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली. संजय राऊत यांनी तू कोण आहे. तू काय उखडणार आहे. अशी जळजळीत टीका केली. त्यानंतर नारायण राणे यांनीही पटलवार केला.
उद्धव ठाकरे यांना भेटून संजय राऊत यांची तक्रार करणार असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं. राऊत संसदेत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलायचे. राऊत यांचे कारनामे सांगितले तर ठाकरे चपलेनं मारतील. असा घणाघात नारायण राणे यांनी केला.
माझ्या आयुष्यात मी नारायण राणे यांना कधी भेटलो नाही. मी कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही. त्यांचं तोंडही बघत नाही. त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायची इच्छा व्यक्त झाली हे चांगलं लक्षण असल्याचं संजय राऊत यांनी म्हंटलं. आताचं माझं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं. मी हसलो, तेही हसले, असंही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी नारायण राणे यांना सुरक्षा सोडून येण्याचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान नारायण राणे यांनी स्वीकारलंय. राऊत यांना जोकर म्हणतं बोलावलं तिथं जाऊ, असं राणे म्हणाले.
राणे कुटुंब आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये कायमच राजकीय वाद आणि वार पलटवार सुरुच असते. पण आत्ताचा वाद एकमेकांना पाहून घेण्याची भाषा करण्यापर्यंत पोहोचलाय.