Tv 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : गुजरातचा पहिला दौरा हा अभ्यासदौरा होता. उत्तम वॉर रूम, डॅशबोर्डचा अभ्यास केला. पुढचा मध्यप्रदेशचा करणार आहोत. पुढं गरजेनुसार तेलंगणाची व्यवस्थाही समजून घेऊ. जनतेच्या सेवेसाठी लोकांच्या योजना त्वरेने व्हाव्यात, याचा अभ्यास करण्यात आला, असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. या देशात उत्तम कार्य महाराष्ट्रानं करावं, ही अपेक्षा आहे. टीका करणारे लोकं या देशाला एक मानत नाही. नाव राष्ट्रवादी, काम प्रांतवादी आणि विचार हा बारामतीवादी. असे लोकं गुजरात हा महात्मा गांधी यांचा आहे. गुजरात हा सरदार वल्लभभाईंचा आहे. परिवारवादी लोकं अशा दौऱ्यांवर टीका करतील, असंही मुनगंटीवार म्हणाले.
शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याचा ब्रेन हॅक करण्यात आलं. जनादेशाचा अवमान करून सत्ता घेतली. पन्नास वर्षे हे सत्तेत होते. पण, राज्याच्या प्रगतीचा विचार यांच्याकडून कधी येत नव्हता. मुंबई-पुण्याचा रस्ता एक्सप्रेस हायवे झाला. ग्रामसडक योजना, जलसंधारणाची कामे, महाराष्ट्राच्या शेतीमध्ये आमुलाग्र बदल झाला. यासाठी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेनंच काम केलंय. टीका करणे आणि भ्रम निर्माण करणे, हा यांचा एककलमी अजेंडा आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
एका संघटनेवर राष्ट्रविरोधी कारवाई करते म्हणून बंदी घातली. आता तुम्ही आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करता. म्हणून तुमची पोटदुखी जनता समजून घेत आहे. सरकार तुमचं होतं तेव्हा आरएसएसवर बंदी का आणली नाही. असा प्रश्न स्वतःला किंवा स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना विचारावा, असंही मुनगंटीवार यांनी म्हंटलं.
छगन भुजबळ यांना देवी सद्बुद्धी देवो. सत्ता गेल्यावर अशाप्रकारचे वक्तव्य केली जातात. सत्ता गेल्यावर तोल जाण्यास शक्यता आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते संवेदनशील आहेत. त्यामुळे एखादा आमदार किंवा नेता यांनी केलेलं भाष्य ही पक्षाची भूमिका नाही, असंही त्यांनी सांगितलं.