नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना हॉस्पिटल आणि प्रशासनाचे नवनवे प्रताप उघडकीस येत आहेत. आता खाजगी रुग्णालयांनी भरमसाठ बिल भरण्याची दादागिरी नव्याने सुरु केल्याचे चित्र दिसत आहे. याविरोधात आता मनसेने आवाज उठवला आहे. (Navi Mumbai MNS warns Private Hospitals for Unnecessary Billing)
नवी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलने कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह देण्यासाठी सात लाख बिल भरा सांगून नातेवाईकांची अडवणूक केल्याचा आरोप आहे. तर अपोलो हॉस्पिटलने चार दिवस ॲडमिट पोलिस हवालदाराला तीन लाखाचे बिल भरल्याशिवाय डिस्चार्ज न देण्याचा इशारा दिल्याचा दावा केला जात आहे.
खाजगी रुग्णालयातील चाललेल्या लुटीबद्दल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरुद्ध आवाज उठवला. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी या दोन्ही खाजगी हॉस्पिटलमधील प्रकार नवी मुंबई मनपा आयुक्तांना तातडीने भेटून त्यांच्या कानावर घातला.
नवीमुंबई Relience हाॅस्पिटल ने कराेना पेशंट मृत झाल्यानंतरही मृतदेह देण्यासाठी ७ लाख बिल भरा म्हणुन नातेवाईकांची अडवणूक केली तर अपाेलाे हाॅस्पिटल ने ४ दिवस ॲडमिट पाेलिस हवालदार यांना ३ लाख बिल भरल्याशिवाय Discharge देणार नाही म्हणुन सांगितले.
आयुक्तांना सांगुन बिल माफ करुन घेतले. pic.twitter.com/lU7OBgP3Wc— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) June 18, 2020
मनसेच्या तक्रारीची दखल घेत आयुक्तांकडून या खाजगी हॉस्पिटल्समधील बिल माफ करुन घेण्यात आले. आता यापुढे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पेड चार्जेस तसेच डॉक्टरच्या तपासणी फीपासून इतर सर्व बिलांची माहिती हॉस्पिटलमधील दर्शनी भागात लागली पाहिजे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा : Thyrocare | मनसेने नवी मुंबईत थायरोकेयर लॅब बंद पाडली, चुकीचे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारीनंतर आंदोलन
हे प्रकरण जरी आयुक्तांच्या आणि मनसेच्या मध्यस्थीने मिटवण्यात आले असले तरीही या मुजोर खाजगी हॉस्पिटलच्या लुटमारीचा प्रश्न तसाच अनुत्तरित राहिला आहे. प्रशासन आणि सरकारने या मुजोरीला चाप लावावा अन्यथा मनसेला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा यावेळी गजानन काळे यांनी दिला.
नवी मुंबईकरांना काेणत्याही खाजगी हाॅस्पिटल ने भरमसाठ बिल भरण्याची दादागिरी केल्यास आम्हाला संर्पक करा…@mnsadhikrut pic.twitter.com/Br120DM6G4
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) June 18, 2020