नवी मुंबई : वाशीमध्ये मशिदीच्या मौलवीला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मौलवीसोबतच तीन फिलिपिनी नागरिकांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मशिदीत आलेल्या नागरिकांनाही संसर्ग झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Navi Mumbai Mosque Mawlawi detected Corona)
नवी मुंबईमध्ये एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. त्यामध्ये फिलिपिन्स देशाच्या तिघा नागरिकांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी वाशीच्या नूर मशिदीमध्ये 10 फिलिपिनी नागरिक धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. या मशिदीमध्ये ते दोन दिवस थांबले होते.
मशिदीमध्ये त्या दिवशी नमाज अदा करण्यासाठी आलेल्या 50 जणांना ‘होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या मौलवीला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर आयसोलेशन वॉर्ड म्हणजेच विलगीकरण कक्षामध्ये 12 जणांना ठेवण्यात आलं आहे.
फिलिपिन्सच्या 68 वर्षीय नागरिकाचा सोमवार 23 मार्चला मुंबईत मृत्यू झाला होता. परंतु त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झालेल्या त्या रुग्णाचा कोरोना हा आजार बरा झाला होता. त्याला असलेल्या मधुमेह आणि अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.
मुंबई-दिल्ली फिरलेल्या फिलिपिन्सच्या ‘त्या’ नागरिकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू नाही
मृत्यू झालेल्या फिलिपिन्सच्या संबंधित नागरिकाने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केलं होतं. हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला होता. त्यामुळे सर्वत्र धाकधूक वाढली होती.
राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या १८ नविन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे.या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगली मधील इस्लामपूरचे ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. #CoronaVirusUpdates pic.twitter.com/27J72wx6UK
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 24, 2020
फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास
(Navi Mumbai Mosque Mawlawi detected Corona)