Navneet Rana : संजय राऊतांनी मला जातीवरून हिणवलं, गुन्हा नोंदवा, नवनीत राणांचा दुसरा लेटरबॉम्ब

| Updated on: Apr 26, 2022 | 11:09 PM

आता नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्तांना (Mumbai Police) एक पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी संजय राऊत यांनी मला जातीवरून हिणावल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे संजय राऊतांनी नवनीत राणा यांच्यावर दुसरा आरोप केलाय.

Navneet Rana : संजय राऊतांनी मला जातीवरून हिणवलं, गुन्हा नोंदवा, नवनीत राणांचा दुसरा लेटरबॉम्ब
नवनीत राणा यांचे संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध नवनीत राणा(Navneet Rana) , रवी राणा आणि  शिवसेना (Sanjay Raut) असा जोरदार सामना सुरू आहे. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. कधी भ्रष्टाचारावरून आरोप सुरू आहेत. तर कधी कायदा आणि सुव्यवस्थेवरून तर कधी हिंदुत्वावरून आरोप सुरू आहेत. अशातच आता नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्तांना (Mumbai Police) एक पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी संजय राऊत यांनी मला जातीवरून हिणावल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे संजय राऊतांनी नवनीत राणा यांच्यावर दुसरा आरोप केलाय. नवनीत राणा यांनी डी गँगशी संबंध असलेल्या व्यक्तीकडून नवनीत राणा यांनी कर्ज घेतल्याचा आरोप राऊत यांनी ट्विटरवरून केला आहे. तसेच त्यांनी लगेज दुसरे ट्विट करत नवनीत राणा यांना कडकडीत इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच नवनीत राणा यांनी जातीवरून हिणवल्याच्या आरोपामुळे आता हे प्रकरण जातीय वादाकडे वळण घेतना दिसून येत आहे.

नवनीत राणांचं पोलीस आयुक्तांना पत्र

माननीय पोलीस आयुक्त,

शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ता आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे आकसापोटी वारंवार माझ्याविरुद्ध, मी मागासवर्गीय आहे व चांभार जातीची आहे हे माहित असताना सुद्धा, केवळ मी चांभार समाजाची असल्यामुळं ते मला वृत्तवाहिनींना दिलेल्या मुलाखती दरम्यान हिणवून बोलत असतात. मागील दोन दिवसात विविध वृत्तवाहिनीला त्यांनी ज्या मुलाखती दिल्या त्या मुलाखतीमध्ये त्यांनी मला व माझ्या पतीला दृष्ट हेतूनं तसंच माझी समाजात बदनामी करण्याच्या उद्देशानं वारंवार बंटी आणि बबली म्हणून संबोधन केलं. तसेच मला 420 सुद्ध म्हटलं. खासदार संजय राऊतांच्या चिथावणी वरुन त्यांचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा सुद्धा बोलत होते. त्यांनी माझ्याकरिता रुग्णवाहिका सुद्धा आणून ठेवली होती. असे करुन खासदार संजय राऊत यांनी एका मागासवर्गीय चांभार जातीच्या महिलेला तिच्या घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला, ऐवढेच नव्हेतर घराच्या बाहेर निघाल्यास मारण्याची धमकी सुद्धा दिली. तसंच संजय राऊत यांनी टी.व्ही. चॅनलवर येवून मला व माझ्या पतीला 20 फूट जमिनीत गाडून टाकू व मी माझ्या गवऱ्या स्मशानात रचून ठेवायला हव्यात अशी धमकी दिली. असे करुन त्यांनी एका चांभार जातीचे मागासवर्गीय महिलेवर जाणून बुजून अत्याचार केलेला आहे. संजय राऊत हे ओबीसी प्रवर्गात येतात व ते अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गात येत नाहीत. तरीही खासदार संजय राऊत व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध अनुसूचित जाती व जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा.

कुणाच्या आरोपात किती तथ्य?

आता या पत्रावरून उद्यापासून नवं रणकंदण सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तसेच या पत्राची दखल पोलीस आयुक्त घेणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी हा वाद राणा दाम्पत्याला हा वाद चांगलाच चर्चेत ठेवत आहे. आता कुणाच्या आरोप किती तथ्य हे भविष्यात कळेल.