नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला, विनायक राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 05, 2021 | 2:24 PM

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे. या देशात खंजीर खुपसणारा नेता म्हणजे नारायण राणे आहेत, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला, विनायक राऊत यांचा हल्लाबोल
विनायक राऊत
Follow us on

मुंबई: शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे. या देशात खंजीर खुपसणारा नेता म्हणजे नारायण राणे आहेत. उपकारकर्त्या शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. सोनिया गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला आदरणीय शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि इतरांना शहाणपण शिकवायला निघालेत आहेत, असं प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी दिलं आहे.

खंजीर खुपसण्याचा इतिहास राणेंनी निर्माण केला

खंजीर खुपसण्याचा इतिहास राजकारणात नारायण राणे यांनी निर्माण केला त्यामुळे त्यांनी इतरांवर बोलू नये, असं विनायक राऊत म्हणाला. गटारीचा महामेरू म्हणजे नारायण राणे आहेत.सर्व पक्षांशी गद्दारी कोणी केली असेल तर नारायण राणे यांनी केली आहे. काँग्रेस मध्ये गेलात शिवसेनेशी गद्दारी करूनच गेलात नाव असा सवाल विनायक राऊत यांनी नारायण राणेंना केला आहे.

नारायण राणे मोदी शाह यांच्या बद्दल काय बोलले होते?

नारायण राणे यांनी यापूर्वी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्माननीय गृहमंत्री अमित शाह यांचा खालच्या भाषेमध्ये उल्लेख केला होता. नारायण राणेंनी अत्यंत खालच्या भाषेत पंतप्रधानांवर टीका केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर टीका केली होती, त्याबद्दल वाचन करावं, असं प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी दिलंय. देवेंद्र फडणवीसांचं किती कुंडल्या बाहेर काढल्या? विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या इतिहासाचं वाचन केलं होतं ते विसरलात का? असं राऊत म्हणाले. भाजपमध्ये गेल्यावर आता शुद्ध विचारवंत म्हणून समजू नका, असं राऊत म्हणाले.

आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आदरणीय शरद पवार यांच्यात राजकीय वैर होतं पण व्यक्तिगत वैर नव्हतं. बाळासाहेबांनी बारामतीच्या विकासाबद्दल कौतुक नेहमी केलं होतं तेच मुख्यमंत्र्यांनी केलं. नारायण राणेंनी सिल्वासामध्ये जाऊन दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला असता तर आणखीन मतं डेलकरांना मिळाली असती आणि त्यांच्या उमेदवाराला किती मतं मिळाली असती हे कळल असतं, असं विनायक राऊत म्हणाले.

चिपी विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना कान टोचण्याची वेळ नारायण राणे यांनीच आणलीय, असं विनायक राऊत म्हणाले.चिपी विमानतळाची जमीन तुम्ही हडप करायला निघाला होतात,त्याचा भांडाफोड शिवसेनेने केला आहे, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

राऊत स्वतःला न्यायाधीश समजतात; देशमुख प्रकरणावरून लाड यांची टीका

भित्र्या लोकांनी पक्षांतर करत मंत्रिपद मिळवलं, त्यांनी ठाकरे सरकारची काळजी करु नये, नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार