मुंबई: दोन वर्षानंतरही सरकार पाडता आलं नाही. त्यामुळे भाजप हतबल झालं आहे. आमदार खरेदीचा कार्यक्रम येथे करता आला नाही. त्यामुळे आता चंद्रकांत पाटलांना हटवायचं की देवेंद्र फडणवीसांना हटवायचं अशी चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये आता खदखद सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेकजण पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक असून लवकरच घरवापसीचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने कामाचा लेखाजोखा मांडला. हा लेखाजोखा मांडत असतानाच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. विनोद तावडेंची तिकीट देवेंद्र फडणवीसांनी कापलं. पण आता तावडेंचं केंद्रात पुनर्वसन करण्यात आलं आहे. सध्या भाजपमध्ये खदखद सुरू आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपतून अनेक नेते येतील. पक्षातून गेलेल्यांचा घरवापसीचा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे, असं मोदींनी सांगितलं.
भाजप आता हतबल झालं आहे. दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही. आमदार खरेदीचा कार्यक्रमही इथे करता आला नाही. विरोधी पक्षाची गँग त्यात अयशस्वी झाली आहे. आता चंद्रकांत पाटलांना हटवायचंय की देवेंद्र फडणविसांना हटवायचंय? भाजप अंतर्गतच नव्या विरुद्ध जूने वाद निर्माण झाला होता. फ्रॉड लोकांना सोबत घेऊन फडणवीस राजकारण करत होते. ज्यांना फडणविसांनी साईडलाईन केलं होतं असे तावडें सारखे नेते आता केंद्रात मोठ्या पदावर गेले आहेत. यावरुन साईड लाईन केलेल्यांना पुन्हा पुढे आणायचं असं भाजपने ठरवल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व काय तो निर्णय घेईल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या विषाणूवरही भाष्य केलं. अफ्रिकन स्ट्रेनला रोखायचं असेल तर आंतरराष्ट्रीय सीमा बंद करणं महत्वाचं आहे. पहिल्या वेळी उशीर झाला आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यावेळी आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे. नंतर कितीही उपाययोजना केल्या तरी व्हायरसला रोखणं मुश्कील होतं. केंद्र आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल ही अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
VIDEO: ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण, मलिक म्हणतात, ‘बाते कम, काम ज्यादा’ हेच आमचं धोरण
दाटून कंठ येतो, ‘रोखठोक’ बाप लेकीच्या लग्नात हळवा, राहुल देशपांडेंच्या गाण्यानंतर राऊत बंधू भावूक