मुंबई : नायर रुग्णालयात आत्महत्या केलेल्या 26 वर्षीय डॉक्टरविषयी धक्कादायक माहितीसमोर आली आहे. प्रेयसीचं लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरल्यामुळे डॉक्टर भीमसंदेश तुपे यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात डॉ. तुपेंनी 15 फेब्रुवारीला औषधं घेऊन आयुष्य संपवलं होतं. (Mumbai Nayar Hospital Doctor Bhimsandesh Tupe Suicide Mystery Solved)
नागपुरातील तरुणीशी प्रेमसंबंध
डॉक्टर भीमसंदेश तुपे यांचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ती नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. एमबीबीएसचं शिक्षण घेत असताना दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. पुढील अभ्यासासाठी डॉक्टर तुपे मुंबईत आले, तर संबंधित तरुणी नागपूरमध्ये शिक्षण घेत होती. नंतरच्या काळातही दोघं फोन आणि मेसेजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.
प्रेयसीचं लग्न ठरल्यामुळे नाराजी
काही दिवसांपूर्वी डॉक्टर तुपे यांच्या प्रेयसीचं अन्यत्र लग्न ठरलं होतं. त्यामुळे ते काहीसे नाराज होते. त्यामुळेच भीमसंदेश यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
वडिलांचं हार्ट अटॅकने निधन
डॉ. तुपे नायर रुग्णालयात अॅनस्थेशिया म्हणजेच भूलतज्ज्ञ होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर डॉ. तुपे नायर रुग्णालयात परतले. 15 फेब्रुवारीला दिवसभर त्यांनी रुग्णालयात नेहमीप्रमाणे काम केलं.
रुममध्ये मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
डॉ. तुपे ज्या खोलीत झोपायचे, ती खोली सकाळी उशिरापर्यंत बंद होती. खोलीचं दार ठोठावूनही आतून काहीही उत्तर आलं नाही. त्यामुळे काही जणांनी मिळून खोलीचं दार उघडलं. तेव्हा डॉक्टर तुपे हे मृतावस्थेत आढळून आले होते. आग्रीपाडा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
Maharashtra: A 26-year-old doctor allegedly died by suicide at Nayar Hospital in Mumbai. His body was found in his room & has been sent for postmortem. Reason behind the suicide yet to be ascertained. Police registered an Accidental Death Report. Further investigation is underway
— ANI (@ANI) February 16, 2021
पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करुन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला होता.
संबंधित बातम्या :
मुंबईतील नायर रुग्णालयात 26 वर्षीय डॉक्टरची आत्महत्या
(Nayar Hospital Doctor Bhimsandesh Tupe Suicide Mystery Solved)